जनता बँक निवडणुकीत नेहमीप्रमाणे पहिल्या फेरीत परिवार पॅनल पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 15:41 IST2021-03-16T15:41:26+5:302021-03-16T15:41:31+5:30
साेलापूर लोकमत ब्रेकींग

जनता बँक निवडणुकीत नेहमीप्रमाणे पहिल्या फेरीत परिवार पॅनल पुढे
सोलापूर : सोलापूर सहकारी जनता बँक पंचवार्षिक निवडणुकीत कोणाची वर्णी लागेल ? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच मंगळवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीच्या प्राथमिक माहितीनुसार संघ पुरस्कृत परिवार पॅनल आघाडीवर आहे.
'नूमवि'च्या सभाग्रहात आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरुवात असून अद्याप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून निकाल जाहीर झालेला नाही. पहिल्या फेरीपासून पॅनल बचाव पॅनल पिछाडीवर आहे.
'नूमवि'च्या प्रांगणात दोन्ही पॅनेलच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली असून या ठिकाणी पोलिस बंदोबस्त देखील आहे. परिवार पॅनल पहिल्या फेरीपासून आघाडी घेत असल्याने बचाव पॅनलमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. संध्याकाळी 5 पर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.