शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

पाण्याच्या बचतीसाठी सोलापूर जिल्ह्यातील १०० गावात ‘जलजागृती’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 14:58 IST

सोलापूर : नाबार्डच्या वतीने जिल्ह्यातील १०० गावांमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर अभियानांतर्गत ‘जलजागृती’ सुरू असून प्रामुख्याने ऊस पीक असलेल्या गावांमध्ये पाणी बचतीसाठीचे प्रबोधन सुरू असल्याचे नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी  प्रदीप झिले यांनी सांगितले.सोलापूरसह राज्यातील १० जिल्ह्यात हे जलजागृती अभियान सुरू आहे. १५ आॅगस्ट रोजी या अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या ...

ठळक मुद्देपाण्याच्या बचतीसाठी शेतकºयांचे प्रबोधनसोलापूरसह राज्यातील १० जिल्ह्यात हे जलजागृती अभियान सुरू५ सप्टेंबरपर्यंत निवडलेल्या १०० गावात हे अभियान चालणार

सोलापूर : नाबार्डच्या वतीने जिल्ह्यातील १०० गावांमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर अभियानांतर्गत ‘जलजागृती’ सुरू असून प्रामुख्याने ऊस पीक असलेल्या गावांमध्ये पाणी बचतीसाठीचे प्रबोधन सुरू असल्याचे नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी  प्रदीप झिले यांनी सांगितले.

सोलापूरसह राज्यातील १० जिल्ह्यात हे जलजागृती अभियान सुरू आहे. १५ आॅगस्ट रोजी या अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते झाला असून ५ सप्टेंबरपर्यंत निवडलेल्या १०० गावात हे अभियान चालणार आहे. ऊस क्षेत्र अधिक असलेली गावे या अभियानासाठी निवडली असून या गावात मोबाईल व्हॅनद्वारे जलदूत शेतकºयांशी संवाद साधणार आहे. पाटाणे पाणी दिल्याने वाया जाणारे पाणी, ठिबक व स्प्रिंकलरमुळे वाचणारे पाणी तसेच कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळते, यासाठीची माहिती दिली जाणार आहे. जलजागृती अभियानाविषयी  या गावातील शेतकºयांच्या प्रतिक्रिया नाबार्डला जलदूत पाठविणार आहे.

कृषी अधिकारी व साखर कारखान्यांची यासाठी मदत घेतली जाणार असून यासाठी कार्यशाळाही घेण्यात आली असल्याचे नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी  प्रदीप झिले यांनी सांगितले. या जलजागृती अभियानासाठी सोलापूर, लातूर, वाशीम, अहमदनगर, कोल्हापूर,  सांगली, बीड, अमरावती, यवतमाळ व वर्धा या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.

ठिंबक सिंचनाचा वापर करावा- सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणासह भीमा व सीना या प्रमुख नद्या याशिवाय मध्यम व लघू प्रकल्पामुळे शेतीला पाणी मिळण्याची सुविधा आहे. मुबलक पाणी असलेल्या व भागातील शेतकरी शासन आदेशालाही न जुमानता पिकांना मुबलक पाणी देत आहेत. यामुळेच नाबार्डने पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे. अधिकाधिक शेतकºयांनी ठिबकचा वापर करावा, हा यामागचा उद्देश आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीwater shortageपाणीटंचाईSugar factoryसाखर कारखाने