शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

जयसिंगपूरच्या तरुणीची पंढरपुरात आत्महत्या, तिसऱ्या मजल्यावरुन टाकली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 11:28 IST

सदर तरुणी मानसिक आजाराने त्रस्त असल्याने तिने इमारतीवरून उडी मारली असल्याची शक्यता.

पंढरपूर : विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या जयसिंगपूर येथील एका महिलेने पंढरपूर नगरपरिषदेच्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. शैलजा शहापुरे (वय-३५) असे मृत तरुणीचे नाव आहे. रविवारी (दि.३०) दुपारी ही धक्कादायक घटना घडली.दरम्यान, पोलिसांच्या तपासात सदर तरुणी मानसिक आजाराने त्रस्त असल्याने तिने इमारतीवरून उडी मारली असल्याची शक्यता वर्तवली आहे. मृत शैलजा शहापुरे हिच्या कुटुंबीयांशी पोलिसांनी संपर्क साधला असता मागील काही वर्षांपासून ती मानसिक आजारी असल्याची माहिती दिली. तिच्यावर सांगली येथील मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारदेखील सुरू होते.

विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी ती पंढरीत आली होती. यावेळी तिने नगरपालिका शॉपिंग सेंटरमधील एका सोनाराच्या दुकानात येऊन सोने मोडायचे असल्याबाबत केवळ चौकशी केली. यानंतर पालिकेच्या इमारतीचे शटर उघडे असल्याने तिसऱ्या मजल्यावर प्रवेश केला. येथील कठड्यावरून तिने थेट खाली उडी मारली. पालिकेच्या तळमजल्यावर वाहनतळ असून येथे जोरदार आवाज झाल्याने दुकानदारांनी पाहिले. परंतु सदर महिला गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी मयत शैलजा शहापुरे यांच्या वडिलांशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणी कोणावरही संशय नसल्याचे सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSolapurसोलापूर