जय हरी माऊली; संत तुकोबांच्या पादुका एस-टी बसने पंढरपूरला येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 11:56 AM2020-06-27T11:56:36+5:302020-06-27T12:04:59+5:30

३० जून रोजी होणार प्रस्थान; केवळ १० वारकºयांना शासनाने दिली परवानगी

Jai Hari Mauli; Saint Tukoba's Paduka will come to Pandharpur by S-T bus | जय हरी माऊली; संत तुकोबांच्या पादुका एस-टी बसने पंढरपूरला येणार

जय हरी माऊली; संत तुकोबांच्या पादुका एस-टी बसने पंढरपूरला येणार

Next
ठळक मुद्देअनगडशहा वली दर्ग्याजवळील पादुकांच्या ठिकाणी पहिली अभंग आरती दुसरी अभंग आरती चिंचोलीत झाल्यानंतर पादुका सोहळा पुढे जाणार रोटी घाटात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तिसºया अभंग आरती

सोलापूर : आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखी एसटी बसमध्ये ठेऊन ३० जूनला पालखी मार्गाने पंढरपूरला येणार आहे़ यामध्ये सहभागी होणारे सेवेकरी आणि मानकरी यांची कोरोना तपासणी केली जाणार असून दहा जणांनाच परवानगी मिळणार आहे, पोलीस आणि आरोग्य विभागाचे पथकही सोहळ्याबरोबर असणार आहे.

३० जूनला पहाटे सहाच्या सुमारास प्रस्थान ठेवल्यानंतर कापूर ओढ्याजवळ असलेल्या अनगडशहा वली दर्ग्याजवळील पादुकांच्या ठिकाणी पहिली अभंग आरती होईल, यानंतर दुसरी अभंग आरती चिंचोलीत झाल्यानंतर पादुका सोहळा पुढे जाणार आहे. रोटी घाटात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तिसºया अभंग आरतीसाठी काही वेळ एसटी बस थांबणार आहे, तेथून हा सोहळा वाखरी येथे दुपारी बाराला पोहचणार आहे. याठिकाणी संतभेट, चौथी अभंग आरती होईल, संस्थानच्यावतीने नैवद्य दाखविण्यात आल्यानंतर पादुका पंढरपुरात सायंकाळी चारच्या सुमारास पोहचणार आहे.

 पोर्णिमेच्या दिवशी गोपाळपूर येथे काल्याचे किर्तन होणार असून पादुका नगरप्रदक्षिणा करून पुन्हा श्री संत तुकाराम महाराजांच्या मठामध्ये नेण्यात येणार आहे.

Web Title: Jai Hari Mauli; Saint Tukoba's Paduka will come to Pandharpur by S-T bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.