शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्री विशेष; दुपारी पावणेदोनपर्यंत घटस्थापना केल्यास होईल लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 16:31 IST

मोहन दाते; २५ आॅक्टोबर रोजी होणार दसरा साजरा

ठळक मुद्देदुगार्देवीच्या नावाने ओळखल्या जाणाºया शक्तिरूपाची पूजा करण्याचा नऊ दिवसांचा नवरात्रोत्सवनवरात्र सुरू झाल्यापासून दहाव्या दिवसापर्यंत सर्व घरांमध्ये विधिवत पद्धतीने दुगार्देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जातेशनिवारी पहाटे पाचपासून दुपारी पावणेदोनपर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करणे लाभदायक

सोलापूर : दुगार्देवीच्या नावाने ओळखल्या जाणाºया शक्तिरूपाची पूजा करण्याचा नऊ दिवसांचा नवरात्रोत्सव १७ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. नवरात्र सुरू झाल्यापासून दहाव्या दिवसापर्यंत सर्व घरांमध्ये विधिवत पद्धतीने दुगार्देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. शनिवारी पहाटे पाचपासून दुपारी पावणेदोनपर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करणे लाभदायक असल्याची माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

विजयादशमी, दसरा, सीमोल्लंघन हे २५ आॅक्टोबर रोजी असून, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी २.१८ ते ३.०४ या दरम्यान आहे. या वर्षी महाराष्ट्रात मुंबई, ठाणे भागामध्ये २३ आॅक्टोबर रोजी महाअष्टमीचा उपवास असून, उर्वरित महाराष्ट्रामध्ये २४ आॅक्टोबर रोजी महाअष्टमी उपवास करावा, असेही दाते यांनी सांगितले आहे.----------नवरात्रीच्या नवव्यादिवशी दसरा...दरम्यान, मंगळवार २० आॅक्टोबर रोजी ललिता पंचमी, २३ आॅक्टोबरला महालक्ष्मी पूजन, २४ रोजी महाअष्टमीचा उपवास, २५ आॅक्टोबर रोजी रविवारी नवरात्र समाप्त होणार असून, याचदिवशी दसरा साजरा होणार आहे. सर्वसाधारणपणे नवरात्रोत्थापन व दसरा एकाच दिवशी किंवा वेगवेगळ्या दिवशी आले तरी घटस्थापनेपासून दसºयापर्यंत नऊ दिवस किंवा दहा दिवसांचे अंतर असते. या वर्षी घटस्थापनेपासून नवव्या दिवशी दसरा आहे. यापूर्वी अनेक वेळेस असे झाल्याचे दाते यांनी सांगितले़------------देवी उपासनेचा काळ...हिंदू संस्कृतीमध्ये कोणतेही काम करण्याचा एक शुभमुहूर्त असतो. त्याप्रमाणे घटस्थापनेचाही एक शुभमुहूर्त असतो. नवरात्र उत्सवाची सुरुवात उद्या (शनिवार) आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून घटस्थापनेने होणार आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, यालाच नवरात्र उत्सव असे म्हणतात. नवरात्रात घरोघरी घटस्थापना केली जाते. या नवरात्रीत देवीपुढे अखंड दीप लावला जातो. रात्री देवापुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची भजने, स्तोत्रं म्हटली जातात. या घटासमोर बसून उपासना करणा?्यांचे मन शांत, प्रसन्न व स्थिर होते. देवीची त्या भक्तावर कृपा होते. त्याला सुख, शांती अन् समाधान लाभते.

 

टॅग्स :SolapurसोलापूरNavratriनवरात्रीAdhyatmikआध्यात्मिक