अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास सोलापुरातील चार जणांना निमंत्रण

By काशिनाथ वाघमारे | Updated: January 10, 2024 16:51 IST2024-01-10T16:51:02+5:302024-01-10T16:51:29+5:30

या निमंत्रित व्यक्तींना श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या स्थानिक समितीच्या वतीने भेटून निमंत्रण देण्यात आले.

Invitation to four people from Solapur for the inauguration ceremony in Ayodhya | अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास सोलापुरातील चार जणांना निमंत्रण

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यास सोलापुरातील चार जणांना निमंत्रण

सोलापूर :  श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या धाम येथे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीरामलला  प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील क्रीडा, सामाजिक व उद्योजक क्षेत्रातील चार व्यक्तींना निमंत्रण मिळाले आहे. या निमंत्रित व्यक्तींना श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या स्थानिक समितीच्या वतीने भेटून निमंत्रण देण्यात आले.

भटक्या विमुक्त समाजातील मरीआईवाले समाजाचे प्रमुख पंच व भटके विमुक्त विकास परिषदेचे उपाध्यक्ष श्री दगडूजी निंबाळकर (पेनुर,ता.मोहोळ), उद्योजक राम रेड्डी तसेच आंतरराष्ट्रीय टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे (बार्शी), सी.ए. राज मिणीयार या  चार व्यक्तींना समितीच्या वतीने प्रत्यक्ष अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी निमंत्रण मिळाल्याने त्यांचे कुटुंबीय आनंदित झाले आहेत.

यावेळी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या शहर जिल्हा समिती कडून सुनील इंगळे, हृषीकेश कुलकर्णी, मंगेश मासाळ, असीम सिंदगी आदीनी निमंत्रणे दिली.

Web Title: Invitation to four people from Solapur for the inauguration ceremony in Ayodhya