शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

मुलाखत;  हुमणीच्या प्रादुर्भावाने ऊस उत्पादनात झाली घट : सुभाष घाडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 16:46 IST

हुमणी ही किड बहुभक्षी किड असून भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये आढळून येते. हुमणीविषी पीक संरक्षण विभागाचे कृषी उपसंचालक  सुभाष घाडगे याची घेतलेली मुलाखत़

ठळक मुद्देहुमणीमुळे ऊसाच्या उगवणीत ४० टक्के नुकसानहुमणी किड अनेक पक्ष्यांचे आवडते खाद्यहुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन करावे

सद्यस्थितीत अनेक भागात ऊसावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. प्रतिकुल हवामान, कमी पाऊसमान यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. हुमणी ही किड ऊसाची पांढरी मुळे खात असल्याने ऊस उत्पादनात मोठया प्रमाणात घट येण्याची शक्यता असते. त्यामुळे हया किडीचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे. हुमणी ही किड बहुभक्षी किड असून भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये आढळून येते. हुमणीविषी पीक संरक्षण विभागाचे कृषी उपसंचालक  सुभाष घाडगे याची घेतलेली मुलाखत.

प्रश्न : हुमणीच्या प्रादुर्भावाविषयी काय सांगाल ?उत्तर : हुमणी किडीच्या प्रामुख्याने दोन महत्वाच्या प्रजाती महाराष्ट्रामध्ये आढळून येतात. यापैकी होलोस्ट्रॅकिया सिराटा या जातींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने महाराष्ट्राच्या नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, धुळे, सांगली, कोल्हापूर इत्यादी जिल्हयात दिसून येतो आणि ल्युकोफोलीस लेपिडोफोरा या प्रजातीचा तीव्र प्रादुर्भाव महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्हयाच्या पश्चिम भागात दिसून येतो.

प्रश्न : हुमणीमुळे ऊसाचे किती टक्के नुकसान होऊ शकते ?उत्तर : हुमणीच्या प्रथम अवस्थेतील अळया सुरुवातीच्या काळात कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर उपजिविका करतात व त्यानंतर ऊसाची तंतुमय मुळे खातात, तर प्रौढ भुंगा बाभूळ, कडुनिंब, बोर इत्यादी झाडावर उपजीविका करतात. या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने एका रेषेत असतो. या अळयांनी झाडांची मुळे कुरतडल्यामुळे प्रादुर्भावग्रस्त झाडे सहजरीत्या उपटली जातात. तसेच जोराचे वादळ आल्यास ही झाडे कोलमडून पडतात. हुमणीमुळे ऊसाच्या उगवणीत ४० टक्के नुकसान होऊ शकते.

प्रश्न : प्रादुर्भाव झाल्यास शेतकºयांनी काय करावे ?उत्तर : हुमणीची एक अळी प्रति चौरस मीटर क्षेत्रावर आढळल्यास तसेच झाडांवर सरासरी २० किंवा त्यापेक्षा जास्त भुंगेरे आढळल्यास किड व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन करावे. शिवाय पिक काढणी नंतर खोल नांगरट करुन घ्यावी, त्यामुळे उघडया पडलेल्या अळया गोळा करुन  रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकूण माराव्यात़  शेतातील ढेकळे फोडून घ्यावीत, जेणेकरुन ढेकळांमध्ये असलेल्या हुमणीच्या विविध अवस्थेतील अळयांचा नाश  होतो. यासाठी रोटाव्हेटर किंवा तव्याचा कुळव देखील वापरता येईल.  पावसाच्या पहिल्या सरीबरोबरच भुंगेरे जमिनीतून बाहेर येण्यास सुरुवात होते. संध्याकाळी भुंगेरे झाडांवर दिसून येतात. हा काळ त्यांच्या मिलनाचा असतो. या काळातच बाभूळ, बोर व कडुनिंबाची झाडे हलविल्यास झाडाच्या पानांवरील भुंगरे जमिनीवर पडतात. हे पडलेले भुंगेरे गोळा करुन रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकल्याने अर्ध्या तासात ते मरतात. भुंगेरे मेल्याने एक पिढी नष्ट होते, त्यामुळे त्यांचा जीवनक्रम खंडित होऊन पुढील नुकसान टळते.  

प्रश्न : हुमणीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काय करावे ?उत्तर :  हुमणी किड अनेक पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे, त्यामुळे शेतात पक्षी थांबे लावावेत.  हुमणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिचा नैसर्गिक शत्रूंचा अतिशय महत्वाचा वाटा आहे. त्यामध्ये बगळा, चिमणी, कावळा, घार इ. पक्षी व मांजर, कुत्रा, रानडुक्कर, मुंगूस, उंदीर इ. प्राणी हुमणीच्या अळया आवडीने खातात.  दोन किलो परोपजीवी बुरशी बिव्हेरिया बॅसियाना व मॅटेरायझियम अनिसोपली २० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून पीक लागवडी अगोदर एक हेक्टर जमिनीत मिसळावी म्हणजे प्रथमावस्थेतील अळयांचा बुरशीमुळे नाश होईल.  जिवाणू (बॅसीलस पॉपीली) व सूत्रकृमी (हेटरो-हॅब्डेटीस) हे होलोट्रॅकिया हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. हुमणीच्या अळीला रोगग्रस्त करणाºया सुत्रकृमीचा वापर करावा यासाठी ५० मिली ई.पी. एन कल्चर प्रति १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारावे किंवा २़५ लिटर ई.पी. एन कल्चर प्रति हेक्टर या प्रमाणाने ठिबक/प्रवाही सिंचनातून देणे. तसेच पावडर स्वरुपात असल्यास ३ किलो प्रती हेक्टर याप्रमाणे वापरावे.

प्रश्न : यावर प्रामुख्याने रासायनिक उपाय करावेत ?उत्तर : जमिन तयार करताना अथवा शेणखतामधून फोरेट (१० टक्के दाणेदार) २५ किलो प्रती हेक्टरी या प्रमाणात वापर करावा.  हुमणीच्या नियंत्रणासाठी पहारीच्या साहाय्याने बुंध्यालगत किंवा दोन बुंध्याच्या मध्ये छोटासा खड्डा घ्यावा. या कामी ऊस पिकात खत घालन्याची जी पहार आहे तिचा वापर करावा. फवारणी पंपाचे नोझल काढून बुंध्यालगत ४० मिली क्लोरोपायरिफॉस १० लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची बंध्यालगत तयार केलेल्या खड्डयात आळवणी करावी. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीSugar factoryसाखर कारखाने