शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

सोलापूरात १६ फेबु्रवारीपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, तीन मराठीसह सात भारतीय चित्रपटांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 2:44 PM

प्रिसिजन फाउंडेशन व पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरात १६ ते १८ फेबु्रवारी २०१८ दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे

ठळक मुद्दे- प्रिसिजन फाउंडेशनतर्फे दुसरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- १६ ते १८ फेबु्रवारी २०१८ दरम्यान आयोजन- प्रभात, भागवत, उमा मंदीर चित्रपटगृहात सादरीकरण

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १० : प्रिसिजन फाउंडेशन व पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरात १६ ते १८ फेबु्रवारी २०१८ दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे अशी माहिती सुप्रसिध्द दिग्दर्शक डॉ़ जब्बार पटेल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली़या चित्रपट महोत्सवाचे उदघाटन १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभात थिएटर येथे होणार आहे़ प्रभात, भागवत व उमा मंदीर या चित्रपटगृहात एकूण २० आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखविण्यात येणार आहेत़ उदघाटन सोहळ्यास प्रसिध्द दिग्दर्शक व निर्माते मधुर भांडारकर हे उपस्थित राहणार आहेत़ या महोत्सवात ब्राझील, अर्जंटिना, नेदरलँड, फिलिपाईन्स, जपान, चीन, स्पेन, हंगेरी आणि भारतातील दर्जेदार चित्रपट दाखविण्यात येणार आहेत़ यात पिंपळ, पळशीची पेटी आदी ३ मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत़ याशिवाय सात भारतीय चित्रपटांचा समावेश आहे़यावेळी बोलताना डॉ़ जब्बार पटेल यांनी सांगितले की, या महोत्सवामुळे जगभरात विविध क्षेत्रात जी खळबळ सुरू आहे, ती पहायला मिळणार आहे़ यंदाच्या महोत्सवाची थिम युथ (तरूण) आहे़ या महोत्सवातील सर्वच चित्रपट युवकांशी संबंधित असतील़ तरूणाईसाठी अत्यंत उपयुक्त उपक्रम आहे असेही डॉ़ पटेल म्हणाले़या पत्रकार परिषदेस प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ़ सुहासिनी शहा, प्रभात चित्रपटगृहाचे  संचालक दिपक पाटील, भागवत व उमा मंदीर चित्रपटगृहाचे संचालक भरत भागवत, मधुरा शहा आदी उपस्थित होते़  

टॅग्स :SolapurसोलापूरFilmfare Awards 2018फिल्मफेअर पुरस्कार २०१८