विठ्ठल रूक्मिणी मातेच्या मूर्तीची पाहणी; भारतीय पुरातत्व विभागाचे पथक पंढरीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 15:33 IST2022-05-08T15:33:28+5:302022-05-08T15:33:34+5:30
पंढरपूर - संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या मूर्तीची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद येथून भारतीय पुरातत्व विभागाचे ...

विठ्ठल रूक्मिणी मातेच्या मूर्तीची पाहणी; भारतीय पुरातत्व विभागाचे पथक पंढरीत दाखल
पंढरपूर - संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या मूर्तीची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद येथून भारतीय पुरातत्व विभागाचे पथक पंढरपूर मध्ये दाखल झाले आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास मंदिरात पथकाने मुर्तीची पाहणी केली.
श्री रूक्मिणी मातेच्या चरणाच्या पायाचे टवके पडत असल्याचे वास्तव समोर आले होते. दोन वर्षापूर्वीच भारतीय पुरातत्व विभागाने पूर्णपणे अभ्यासून शास्त्रीय पद्धतीने ही प्रक्रिया केली होती. श्री विठ्ठल रूक्मिणी मूर्तीची झीज यापाठीमागे नित्योपचार, अभिषेक, पदस्पर्श दर्शन , गर्भगृहाची रचना तेथील तापमान या गोष्टी कारणीभूत असल्याचे भारतीय पुरातत्व विभाग यांनी सांगितले होते.
औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्व विभागाचे पथक पहाटे तीन वाजता मंदिरात जाऊन श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या मूर्तीची पाहणी केली. त्यानंतर मूर्तीवरील झीज कशामुळे झाली याचा अहवाल सादर करणार असल्याचे पुरातत्व विभागाचे श्रीकांत मिश्रा यांनी सांगितले.