‘चंद्रभागेचा अभंग’ विसावला ‘इंद्रायणी काठी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 02:31 PM2019-11-20T14:31:17+5:302019-11-20T14:34:32+5:30

संत नामदेवरायांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास यांचे सासवड दिवे घाटात अपघाती निधन झाले.

'Indravani saddle' rested on 'moon's abyss' | ‘चंद्रभागेचा अभंग’ विसावला ‘इंद्रायणी काठी’

‘चंद्रभागेचा अभंग’ विसावला ‘इंद्रायणी काठी’

Next
ठळक मुद्देपंढरपूर ते आळंदी वारी कार्तिकी पायी वारी सोहळा पहाटे चारच्या सुमारास सोहळ्याने पुण्याकडे प्रस्थान ठेवलेदिवे घाटाच्या वर विसाव्याच्या ठिकाणी सर्व दिंडीतील वारकºयांनी चहापान केलेवारकºयांनी चालकाला ‘उतारावरून वाहन आणू नका,’ असे सांगितले होते. तरीही हा जेसीबी तसाच घाटात उताराकडे आला

आळंदी : संत नामदेवरायांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास यांचे सासवड दिवे घाटात अपघाती निधन मंगळवारी (दि.१९) झाले. त्यांचे निधनाने वारकरी संप्रदायाची मोठी हानी झाली. अनेक मान्यवर कीर्तनकार,प्रवचनकार,महंत.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोपान महाराज नामदास यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली. त्यांचे पार्थिवावर येथील इंद्रायणी नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आळंदीवर शोककळा पसरली. राज्यातून आलेले भाविक,वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी सोपान महाराज नामदास यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विष्णू मंदिर येथे ठेवण्यात आले होते. अंत्यविधी पूर्वी मंदिर व ग्राम प्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. यावेळी नागरिक,भाविकांनी दर्शनास गर्दी केली. त्यांचे पार्थिवावर येथील इंद्रायणी नदी घाटावर शोकाकुल वातावरणात भाविक,वारकरी यांचे उपस्थितीत हरिनामाचाचे जयघोषात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी आमदार संजय जगताप.माजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अतुल देशमुख,मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ आरफळकर, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, माजी आमदार प्रकाश देवळे, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक माउली वीर,वारकरी फडकरी संघटनेचे माऊली महाराज जळगावकर, धोंडोपंतबाबा शिरवळकर, बाळासाहेब महाराज उखळीकर, राणू महाराज वासकर, निलेश महाराज लोंढे,माजी नगरसेवक डी.डी.भोसले , बाळासाहेब महाराज शेवाळे,नरहरी महाराज चौधरी,रामभाऊ महाराज राऊत, संजय महाराज घुंडरे, वारकरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष मारुती महाराज कुरेकर, तात्या महाराज कराडकर, मारुति महाराज कोकाटे, आळंदीतील वारकरी ,भाविक, नामदेवरायांचे दिंडीतील मान्यवर, नामदास परिवार,शिष्य,गायक,साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नामदेवरायांचे वंशज नामदास परिवार असून या परिवारा कडून आळंदीत संत ज्ञानेश्?वर महाराज यांचे संजीवन समाधी प्रसंगी कीर्तन सेवेची परंपरा आहे. यसेवेसाठी तसेच आळंदी यात्रेला येण्यासाठी दिंडीचा प्रवास सुरू होता. नामदेवरायांची दिंडी आळंदीला येत असताना दिंडीला अपघात झाला.

- सोपान महाराज नामदास ( वय ३६ ) हे  वै. तुळशीदास महाराज नामदास यांचे चिरंजीव आहेत. ते संत नामदास महाराज यांचे १७ वे वंशज असून ते बालपणापासून आळंदी वारीला येत आहेत. ते कीर्तन सेवेत नेहमी टाळाची सेवा देत असत. ते विवाहित असून केशव महाराज नामदास यांचे ते पुतणे होत.

- सदर अपघात मंगळवारी सकाळी घडला. पंढरपूर ते आळंदी वारी कार्तिकी पायी वारी सोहळा पहाटे चारच्या सुमारास सोहळ्याने पुण्याकडे प्रस्थान ठेवले. दिवे घाटाच्या वर विसाव्याच्या ठिकाणी सर्व दिंडीतील वारकºयांनी चहापान केले. तेथून काही अंतरावर जेसीबीचे ब्रेक निकामी झाल्याची माहिती समजल्यानंतर वारकºयांनी चालकाला ‘उतारावरून वाहन आणू नका,’ असे सांगितले होते. तरीही हा जेसीबी तसाच घाटात उताराकडे आला.

- घटना घडल्यानंतर मृत व जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच संत नामदेव महाराजांचे इतर वंशज व वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर तेथे पोहोचले. रुग्णालय परिसरात मृत तसे जखमींचे नातेवाईक विशेषत: महिला आक्रोश करताना दिसत होत्या. हडपसर व परिसरातील सर्व पक्षांचे नेते व कार्यकर्ते हे धीर देत सांत्वन करताना दिसत होते. 

Web Title: 'Indravani saddle' rested on 'moon's abyss'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.