शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

भारतीय चित्रपटसृष्टीची आॅड्री हेपवर्न साधना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 17:18 IST

१९६० ते १९७० या दशकात एकाहून एक नायिका आशा पारेख , वहिदा रहेमान, वैजयंती माला, नंदा या गाजत होत्या़ ...

१९६० ते १९७० या दशकात एकाहून एक नायिका आशा पारेख, वहिदा रहेमान, वैजयंती माला, नंदा या गाजत होत्या़ त्यामध्ये साधना हिचे नाव वरच्या क्रमांकावर होते. साधना हिचा जन्म कराची/सिंध (आता पाकिस्तानात आहे) येथे २ सप्टेंबर १९४१ रोजी झाला. तिचे आई-वडील सुशिक्षित होते. वडील हरी-शिवदासानी हे सिंधमधील प्रसिद्ध व्यापारी होते. परंतु, फाळणीनंतर ते दंगलमुळे मोठा व्यापार सोडून भारतात आले. ते मुंबई येथे स्थानिक झाले.

साधनाची आई शिक्षिका होती. साधनाचे शिक्षण मुंबईतील जयहिंद कॉलेज येथे झाले. बालपणी तिने १९५५ साली राजकपूर यांच्या गाजलेल्या ‘श्री ४२०’ या चित्रपटात कोरसमध्ये भाग घेतला होता. किशोर वयात देव आनंद हा तिचा आवडता नायक होता. (आणि योगा-योग पाहून १९६२ च्या ‘हम दोनो’ या चित्रपटात त्याची नायिका झाली होती) तिचा एक फोटो प्रसिद्ध चित्रपट पाक्षिक स्क्रीनमध्ये मुखपृष्ठावर झळकला होता. तो फोटो पाहून प्रसिद्ध ‘लव्ह इन शिमला’ योगा-योग म्हणजे त्यात तिचा नायक असलेला जॉय मुखर्जी याचा पण तो पहिलाच चित्रपट होता. दुसरा योगा-योग म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक आर. के. नय्यर यांच्याशी तिने १९६६ ला विवाह केला. नंतर साधनाची कारकिर्दीची कमान चढतीच राहिली.

पहिला चित्रपट व त्यातील हिट गाणी झाल्यामुळे साधनाला मोठ्या बॅनरच्या आॅफर येऊ लागल्या. नंतर बिमल रॉय यांच्या ‘परख’ या  चित्रपटात तिने नायिकेची भूमिका केली. तिचा खरा चलतीचा काळ १९६१ सालच्या ‘हम दोनो’ या देव आनंदच्या चित्रपटापासून सुरू झाला. ज्या देव आनंदकडे ती किशोर वयात पडद्यावर डोळे न मिटता एक टक लावून पाहत होती. तोच तिचा आता नायक झाला होता. हे तिला खरेच वाटत नव्हते. स्वप्न वाटत होते़ ते सत्यात उतरले होते.

देव आनंदचा त्यात डबल रोल होता. देव आनंदचा डबल रोल व जयदेव यांच्या उत्तम संगीतामुळे तो चित्रपट सुपर डुपर हिट झाला. नंतर तिच्या हिट चित्रपटांची रांगच लागली. १९६२ साली ‘असली-नकली’ /पुन्हा देव आनंद/शंकर जयकिसन, १९६३ -‘मेरे महेबूब’/राजेंद्र कुमार/अशोक कुमार, संगीत-नौशाद हा चित्रपट संपूर्ण रंगीत होता. रंगीत चित्रपटामुळे साधनाचे खानदानी मुस्लिम तरुणीचे  सौंदर्य उठून दिसत होते. १९६४ साली ‘वह कौन थी’ यात मनोजकुमार तिचा नायक होता. हा चित्रपट भय कथेवर आधारित होता. याला मदन-मोहन यांचे संगीत लाभले होते. यातील लता मंगेशकर यांची लग जा गले, नयना बरसे ही गाणी अतिशय लोकप्रिय झाली.

नंतर १९६६ साली ‘मेरा साया’ या चित्रपटात तिला डबल रोलची भूमिका मिळाली. यालाही मदन-मोहनचेच संगीत होते तर गाणी लता मंगेशकरांचीच होती. यातील ‘मेरा साया साथ होगा’, नयनों मे बदरा छाये व तिच्या दुहेरी भूमिकेतील अल्लड बंजारन तरुणीचे, आशा भोसलेचे  नृत्यगीत. ‘झुमका गीरा रे’ हे गीत अतिशय गाजले. नंतरच्या ‘वक्त’ या बी़ आऱ चोप्रा यांच्या बॅनरच्या मल्टिस्टार ‘वक्त’ या चित्रपटात ती सुनील दत्तची नायिका झाली. यात सुनील दत्त, साधना, शशीकपूर, राजकुमार, शर्मिला टागोर, बलराज सहानी, मदन पुरी अशी कलाकारांची रांगच होती. याला रवी यांचे संगीत होते. हा चित्रपट अर्थातच सुवर्णमहोत्सवी ठरला. 

राजकुमार या चित्रपटात ती शम्मीकपूरची नायिका होती. याला शंकर-जयकिसन यांचे सुश्राव्य संगीत होते. त्यामुळे हा चित्रपट पण महोत्सवी ठरला. नंतर १९६६ साली आलेल्या आरजू या चित्रपटात ती राजेंद्र कुमारची नायिका होती. शंकर जयकिसन यांचे उत्तम संगीत, रामानंद सागर यांचे दिग्दर्शन व साधनाचे सौंदर्य व अभिनयामुळे हा चित्रपटही हिट झाला, हे सांगणे नकोच. ‘एक मुसाफीर एक हसीना’ या चित्रपटात ती जॉय मुखर्जींची नायिका झाली होती. या चित्रपटाला ओ.पी. नय्यर यांनी एकापेक्षा एक हिट गाणी दिली होती. साधनाचा शेवटचा यशस्वी चित्रपट ‘एक फूल दो माली’ हा होता.- डॉ. अरविंद बोपलकर(लेखक हे सिनेमाचे अभ्यासक आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरAsha Parekhआशा पारेखFilmfare Awardफिल्मफेअर अवॉर्डbollywoodबॉलिवूड