पाच वर्षाच्या मुलीशी अश्लील कृत्य, अल्पवयीन मुलावर गुन्हा

By रूपेश हेळवे | Updated: September 29, 2022 18:18 IST2022-09-29T18:18:26+5:302022-09-29T18:18:29+5:30

पाच वर्षाच्या मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवत तिच्याशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात आला आहे. 

Indecent act with a five-year-old girl, an offense against a minor | पाच वर्षाच्या मुलीशी अश्लील कृत्य, अल्पवयीन मुलावर गुन्हा

पाच वर्षाच्या मुलीशी अश्लील कृत्य, अल्पवयीन मुलावर गुन्हा

सोलापूर :

पाच वर्षाच्या मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवत तिच्याशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात आला आहे. 

पीडित मुलगी ही पाच वर्षाची असून ती, आजी सोबत राहते. ती दररोज दुपारच्या वेळेस शेजारील आरोपी विधी संघर्ष मुलाच्या घरी खेळायला जात होती. विधी संघर्ष मुलाने त्या पीडितेला चॉकलेट देण्याचे आमिष दाखविले. सोमवारी त्या मुलाने तिला आपल्या नातेवाईकाच्या घरी घेऊन जात तिच्याशी अश्लील कृत्य केले. ही बाब पीडित मुलीने आपल्या आजीला सांगितली. यानंतर आजीने याबाबत सोलापुरातील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या तक्रारीवरून १४ वर्षाच्या विधी संघर्ष मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Indecent act with a five-year-old girl, an offense against a minor