सोलापूरजवळील घटना; ट्रॅक्टरसोबतच ४ लाखांचे बांधकाम साहित्य गेले चोरीला
By Appasaheb.patil | Updated: September 5, 2022 15:56 IST2022-09-05T15:56:22+5:302022-09-05T15:56:34+5:30
बेलाटी हद्दीतील घटना; ४ लाखांचा ऐवज लंपास

सोलापूरजवळील घटना; ट्रॅक्टरसोबतच ४ लाखांचे बांधकाम साहित्य गेले चोरीला
सोलापूर : बेलाटी ते पाथरी जाणाऱ्या कॅनॉलमध्ये लवटे यांच्या वस्तीसमोर पाथरी (ता. उ. सोलापूर) येथे घरासमोर लावलेला ट्रॅक्टर व ट्रॅक्टरमध्ये ठेवलेले बांधकामासाठी लागणारे साहित्य चोरून नेल्याची घटना १७ ते २१ ऑगस्टदरम्यान घडली. याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात रविवार, ४ सप्टेंबर रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरी निवृत्ती मोटे (वय ५०, रा. शिंगोली, ता. मोहोळ) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, ७५ हजारांचा लाल रंगाचा ट्रॅक्टर, त्यात पिवळ्या रंगाची विनानंबरची डम्पिंग ट्रॉली, ७७ हजार ३०० रुपयांचे ८ एमएमचे ४८७ किलो, १० एमएमचे ५४९ किलो व वायंडिंग तारेचे बंडल असे एकूण ४ लाख २ हजार रुपयांचे बांधकामासाठी लागणारे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, पुढील तपास पोलीस नाईक कोणदे हे करीत आहेत.