सोलापुरात दारुच्या नादानं लागला चोरीचा नाद; मिळाल्या १६ बाईक

By विलास जळकोटकर | Updated: August 7, 2023 16:54 IST2023-08-07T16:53:04+5:302023-08-07T16:54:32+5:30

गुन्हे शाखेच्या पथकाला खबर मिळाल्याने वरील आरोपीला विना नंबर प्लेटच्या बाईकवर पाहिले. त्यांच्या संशयास्पद हालचालीवरुन ताब्यात घेतले

In Solapur two arrest for theft Got 16 bikes | सोलापुरात दारुच्या नादानं लागला चोरीचा नाद; मिळाल्या १६ बाईक

सोलापुरात दारुच्या नादानं लागला चोरीचा नाद; मिळाल्या १६ बाईक

सोलापूर : पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना खबर मिळाली आणि त्यांनी सापळा लावून दोघांना पकडले. दारुच्या व्यसनासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडून १८ बाईक पकडल्या गेल्या. रविवारी रात्री अक्कलकोट रोड पाण्याच्या टाकीजवळ सापळा लावून  ही कारवाई गुन्हे शाखेच्या पथकाने केली. खाजप्पा उर्फ ओंकार संजय जाधव (वय- २५), संदीप उर्फ संग्या शंकर बनसोडे (रा. वडगाव, ता. दक्षिण सोलापूर) असे या पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. 

शहरात रविवारी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीची धामधुम सुरु होती. या दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाला खबर मिळाल्याने वरील आरोपीला विना नंबर प्लेटच्या बाईकवर पाहिले. त्यांच्या संशयास्पद हालचालीवरुन ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवून विचारणा केली असता त्यांनी पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेल्या इतर १७ दुचाकी दाखवल्या. असा एकूण ५ लाख ३५ हजाराचा मु्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे, सपोनि दादासाहेब मोरे यांच्या पथकाने केली.

Web Title: In Solapur two arrest for theft Got 16 bikes