सोलापुरात कुत्र्यांचा सुळसुळात, अपघातांचं प्रमाण वाढलं; एकाच दिवशी तिघेजण रूग्णालयात!
By विलास जळकोटकर | Updated: November 11, 2023 17:17 IST2023-11-11T17:17:02+5:302023-11-11T17:17:24+5:30
शनिवारी शहरामध्ये दोन ठिकाणी अशाच घटना घडल्या. यात तिघांना जायबंदी व्हावे लागले.

सोलापुरात कुत्र्यांचा सुळसुळात, अपघातांचं प्रमाण वाढलं; एकाच दिवशी तिघेजण रूग्णालयात!
सोलापूर : शहरात श्वानांची संख्या वाढली आहे. यामुळे रस्त्यावर आडवे येऊन दुचाकीचे अपघात दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी शहरामध्ये दोन ठिकाणी अशाच घटना घडल्या. यात तिघांना जायबंदी व्हावे लागले. त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात एक तरुण आणि दोन महिलांचा समावेश आहे. युवराज शंकर दोडमणी (वय- २२), सुशीला विठ्ठल जाधव (वय- ६५), सुवर्णा विष्णू माने (वय- ४०) अशी जखमींची नावे आहेत.
शनिवारी सकाळी ९:३० च्या सुमारास युवराज शंकर दोडमणी (वय २२, रा. अराफत नगर, कुंभारी रोड, सोलापूर) हा तरुण विनायक नगर येथून सात रस्ता चौकाकडे दुचाकीवरुन येत होता. विनायक नगर रोडवर अचानलक कुत्रा आडवा आला आणि दुचाकी घसरुन रोडवर पडल्याने युवराजच्या डोक्याला गंभीर मार लागला.
दुसरी घटना सकाळी ७:३० च्या सुमारास जुना होटगी नाका, सावस्कर हॉस्पिटलसमोरच्या रोडवर घडली. सुशीला विठ्ठल जाधव (वय- ६५), सुवर्णा विष्णू माने (वय- ४०, दोघी रा. हत्तुरे वस्ती, सोलापूर) या दोघी दुचाकीवरुन सात रस्तामार्गे ट्रिपलसीट हत्तुरे वस्तीकडे जात होत्या. सावस्कर हॉस्पिटलसमोरच्या रोडवर कुत्रे आडवे आल्याने तिघेही रस्त्यावर पडले. यात वरील दोघींना तोंडाला, कपाळास मार लागला. शनिवारी सकाळी मुलगी चैतन्या माने हिने दोघींना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोन्ही घटनेतील जखमी शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.