सोलापुरात पहाटेपासून संततधार; सखल भागात साचले पाणीच पाणी
By Appasaheb.patil | Updated: July 18, 2023 15:41 IST2023-07-18T15:40:59+5:302023-07-18T15:41:13+5:30
संततधार पाऊस सोलापूर शहराबराेबरच जिल्ह्यातील विविध भागात सुरू आहे.

सोलापुरात पहाटेपासून संततधार; सखल भागात साचले पाणीच पाणी
सोलापूर : सोलापूर शहरात मंगळवारी सकाळपासून संततधार पावसाने हजेरी लावली. दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, संततधार पावसामुळे शहरातील सखल भागात चांगलेच पाणी साचल्याने वाहनधारकांना पाण्यातून मार्ग काढताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. हा संततधार पाऊस सोलापूर शहराबराेबरच जिल्ह्यातील विविध भागात सुरू आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, आसरा चौक, मंगळवार बाजार परिसर, बोरामणी नाका, शेळगी परिसर, विजापूर वेस, बारा ईमाम चौक, अक्कलकोट रोडवरील काही भागातील नगरात पाणीच पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना वाट काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून शहरातील तापमानात घट झाली होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाला सुरूवात झाली आहे. या पावसामुळे पहिल्या टप्प्यात केलेल्या पेरण्यातील पिकांना जीवदान मिळत असल्याचे बोलले आहे.