शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यात ५९ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र वाढले; पाऊस चांगला पडला तर गाळपाची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2022 15:38 IST

सोलापूर : जिल्ह्यात मागील वर्षापेक्षा ५९ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र अधिक असल्याची आकडेवारी कृषी खात्याची आहे. पावसाने विलंब केल्याचा ...

सोलापूर : जिल्ह्यात मागील वर्षापेक्षा ५९ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र अधिक असल्याची आकडेवारी कृषी खात्याची आहे. पावसाने विलंब केल्याचा परिणाम ऊसवाढीवर नक्कीच होत असला तरीही सरत्या गाळप हंगामाप्रमाणेच उच्चांकी गाळप जिल्ह्यात होईल, असा कृषी खात्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात साखर कारखानदारी वाढत आहे. २००० नंतर एकापाठोपाठ एक असे साखर कारखाने उभारणी झाले. उजनी धरण तसेच गरजेनुसार विविध ठिकाणी झालेले मध्यम, साठवण व लघु तलाव, ओढे-नाल्याची खोदाई व त्यावरील बंधारे, याशिवाय जिल्हाभरात झालेल्या पाणी अडविण्याच्या कामामुळे पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळेच ऊसक्षेत्रात वरचेवर वाढ होत आहे. यामुळेच सरत्या हंगामात ३३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने चालला व राज्यात उच्चांकी गाळपाची नोंद सोलापूर जिल्ह्यात झाली.

पुढील वर्षाच्या गाळपासाठी बंद असलेल्यापैकी एक- दोन साखर कारखाने सुरु होण्याची शक्यता आहे. त्यात जिल्ह्यात मागील वर्षापेक्षा ५९ हजार हेक्टर ऊस क्षेत्र वाढले आहे. यापुढेही पाऊस चांगला पडत राहिला तर उसाची वाढ जोरात होईल व टनेज वाढेल, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

म्हणूनच ऊस लागवडीकडे कल

ढोबळी मिरची फेकून द्यावी लागली, द्राक्ष जागेवरच टाकावी लागली, टोमॅटो, कांदा शेतकऱ्यांना परवडला नाही. ज्वारी, गहू व इतर धान्याचे यापेक्षाही हाल सुरु आहे. मग शेतकऱ्यांनी करायचे तर कोणते पीक?, मागील काही वर्षांचा शेतकऱ्यांचा अनुभव पाहता ऊसतोडणीसाठी थोडा त्रास होईल मात्र बिनबोभाट ऊस जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल ऊस लागवडीकडे वाढलाय. त्यामुळेच जिल्ह्यात ऊस क्षेत्र वाढत असल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले.

चौकट

वर्ष ऊस क्षेत्र (हे.)

  • २०१७-१८ १,५३,५६८
  • २०१८-१९ १,०४,०८६
  • २०१९-२० १,२८,९७९
  • २०२०-२१ १,७१,००१
  • २०२१-२२ २,३०,०५०
  •  

( दोन वर्षांतील तालुकानिहाय ऊस क्षेत्र हेक्टरमध्ये)

  • तालुका २०-२१ २१-२२
  • उत्तर सो. ४०.११ ५२.०३
  • दक्षिण सो. ११०.६८ ११८.६७
  • बार्शी १९.६८ ७३.२०
  • अक्कलकोट१८७.९८ २१५.१७
  • मोहोळ २७९.७४ २२५.९४
  • माढा १७९.४२ ३४९.४७
  • करमाळा १९५.८९ ३७३.८७
  • पंढरपूर ३२७.२१ ४६२.७८
  • सांगोला ३१.४४ ४७.०९
  • माळशिरस २३०.२० २५३.७९
  • मंगळवेढा १०७.६६ १२८.४०
  • एकूण १७१००० २३००००

 

जिल्ह्यात जलसंधारणची कामे मोठ्या प्रमाणावर झाल्याने व मागील दोन वर्षे पाऊस चांगला पडल्याने जमिनीत पाणी जिरले आहे. त्यामुळे ऊस क्षेत्रात वाढ झाली आहे. मागील वर्षभरात जिल्ह्यात जवळपास ६० हजार हेक्टर क्षेत्र ऊस वाढला आहे. यापुढे पाऊस चांगला पडला उसाची वाढ होईल व वजन वाढेल.

- बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेRainपाऊस