सोलापूरमध्ये चोर चोरी करायला घरात गेला गेला अन् तेवढ्यात घर मालक आला ...

By रूपेश हेळवे | Updated: May 11, 2023 15:44 IST2023-05-11T15:40:34+5:302023-05-11T15:44:17+5:30

सोमनाथ हा दरवाज्यातून त्यांच्या घरात प्रवेश करून बेडरूममध्ये जाऊन आतून कडी लावून चोरी करण्याचा प्रयत्न करत होता.

In Solapur, a thief went into a house to steal and... then the owner of the house came... | सोलापूरमध्ये चोर चोरी करायला घरात गेला गेला अन् तेवढ्यात घर मालक आला ...

सोलापूरमध्ये चोर चोरी करायला घरात गेला गेला अन् तेवढ्यात घर मालक आला ...

सोलापूर : घरात चोरी करण्यासाठी गेलेल्या चोराला घर मालकाने रंगेहात पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना सायली हाईटस वसंत विहार येथे मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी श्रीकांत बबन बनपट्टीे ( वय ४०, रा. वसंत विहार) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून सोमनाथ हरिदास सुरवसे ( वय ३४, रा. तोडकर वस्ती, बाळे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी बनपट्टे हे कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी घरात घरकाम करत होत्या. आरोपी सोमनाथ हा उघड्या दरवाज्यातून त्यांच्या घरात प्रवेश करून बेडरूममध्ये जाऊन आतून कडी लावून चोरी करण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान श्रीकांत हे जेवण्यासाठी घरी आल्यानंतर बेडरूमला आतून कडी लावलेली होती. तेव्हा फिर्यादीने जोरजोरात दरवाजा वाजल्यानंतर आरोपी हा दरवाजा उघडून फिर्यादीला जोरात धक्का देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्याला फिर्यादीने पकडले आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिली, अशा आशयाची फिर्याद दिली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी श्रीकांत बनपट्टे यांच्या फिर्यादीवरून सोमनाथ सुरवसे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास घुगे करत आहेत.

Web Title: In Solapur, a thief went into a house to steal and... then the owner of the house came...