शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला ‘चाळिशी’ लागली की गाडीसाठी हवे एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 18:13 IST

नियम जुनाच : बोगस प्रमाणपत्राला लावला ऑनलाइनचा चाप

राजकुमार सारोळे

सोलापूर : वयाची चाळिशी ओलांडली की ‘चाळिशी लागली,’ असे म्हणतात. सध्याच्या जमान्यात ते काही खोटं नाही. स्मार्ट फोन, संगणकावर वारंवार काम करणाऱ्यांची नजर चाळिशीच्या आतच कमजाेर होते. त्यामुळे या वयानंतर वाहन परवाना नूतनीकरण करताना तुमची नजर कशी आहे हे तपासावे लागतेच. त्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र बंधनकारक असून, यातील बोगसगिरी रोखण्यासाठी आता हे प्रमाणपत्र ऑनलाइन द्यावे लागणार आहे.

केंद्रीय मोटार वाहन कायद्यामध्ये अनेक तरतुदी आहेत. पण, याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नव्हती. तक्रारी वाढल्याने नियमांची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी नव्या उपाययोजना करण्यात येत आहेत. वयाच्या चाळिशीनंतर नजर कमजोर होते. अशात महामार्गावर मोटारीच्या दिव्याच्या उजेडात चालवित असलेल्या गाडीचा मार्ग काढणे कठीण असते. त्यामुळे गाडी चालविणाऱ्याला दूरचा चष्मा असणे धोक्याचे असते. त्यामुळे चाळिशीनंतर संबंधित व्यक्तीची नजर व शारीरिकदृष्ट्या लायसन्सधारक वाहन चालवू शकतो का, यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यामुळे या वयानंतर वाहन परवाना नूतनीकरण करताना डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.

लर्निंग लायसन्स ऑनलाइन

  • - सध्या आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसन्स दिले जाते. यासाठी ऑनलाइन अर्ज करून फी भरावी लागते. त्यानंतर लायसन्स टेस्टसाठी अपॉइंटमेंट मिळते.
  • - अपॉइंटमेंटच्या वेळी आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह आरटीओ अधिकाऱ्यांसमोर हजर व्हावे लागते. तेथे अधिकारी कागदपत्रांची तपासणी करून ऑनलाइन चाचणी घेतात.
  • - आता घरबसल्या लर्निंग लायसन्स मिळविण्याची सोय करण्यात येत आहे. यात घरी केव्हाही अर्ज करून ऑनलाइन चाचणी देण्याची सोय करण्यात आली आहे.

 

फिट असेपर्यंत मिळेल लायसन्स

  • - १८ वर्षांनंतर वाहन चालविण्याचा परवाना मिळतो. १८ वर्षांखालील मुलांना फक्त ५० सीसी क्षमतेचे वाहन किंवा विनागिअरचा परवाना मिळतो. पहिल्यांदा २० वर्षे मुदत असते. त्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी लायसन्स नूतनीकरण करता येते.
  • - कोणत्या प्रकाराचे वाहन चालविण्याचा परवाना घेणार यावर नियम वेगवेगळे आहेत. प्रवासी, मालवाहतूक, जड वाहतूक व मल्टीॲक्सल वाहने, क्रेन, पोकलेन मशीन चालविण्याचे परवाने वेगवेगळे आहेत.
  • - वाहन परवाना मिळविण्यासाठी १८ वर्षांनंतर वयाची अट नाही. तुम्ही वाहन चालविण्यासाठी जोपर्यंत फीट आहात तोपर्यंत वाहन परवाना मिळतो. पण, यासाठी चाळिशीनंतर डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

एका डॉक्टरला दिवसाला २० प्रमाणपत्रे देता येणार

१. चाळिशीनंतर डॉक्टरांचे प्रमाणपत्र आवश्यक असल्याने आरटीओ कार्यालयाजवळ बीए एमएस डॉक्टर ठाण मांडून बसलेले दिसतात. हे डॉक्टर कमी फीमध्ये दिवसाला कितीही प्रमाणपत्रे देतात.

२. फिटनेस सर्टीफिकेट देताना संबंधितांचे डाेळे व शारीरिक तपासणी करणे आवश्यक असते. पण, बीए एमएस डॉक्टर डोळ्यांची तपासणी न करताच फी दिली की सर्टीफिकेट देताना दिसून येतात.

३. बोगस प्रमाणपत्राला आळा घालण्यासाठी आता एमबीबीएस डॉक्टरांचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. अशा डॉक्टरांची आरटीओकडे नोंदणी होईल. त्यांना आरटीओचा नंबर मिळेल. त्यावरून दिवसाला फक्त २० प्रमाणपत्रे त्यांना देता येतील, अशी व्यवस्था ऑनलाइन व्यवस्थेत करण्यात आली आहे.

सर्वसामान्य लोकांना आरटीओ कार्यालयाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व सुविधा ऑनलाइन करण्यात येत आहेत. राज्यात दरवर्षी २० लाख लोक लर्निंग लायसन्ससाठी आरटीओकडे येतात. अशा लोकांना एजंटफ्री सेवा मिळण्यासाठी व डॉक्टरांचे बोगस प्रमाणपत्र रोखण्यासाठी डॉक्टरांनाही ऑनलाइन कोड देण्यात येत आहे.

- अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त

टॅग्स :SolapurसोलापूरRto officeआरटीओ ऑफीस