शिवसेनेत हिंमत असेल तर एकट्याने निवडणूक लढवून दाखवावी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 16:32 IST2020-02-12T15:17:27+5:302020-02-12T16:32:52+5:30
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची टीका; शिवसेना, राष्ट्रवादीवर साधला निशाणा

शिवसेनेत हिंमत असेल तर एकट्याने निवडणूक लढवून दाखवावी
ठळक मुद्दे- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज सोलापूर दौºयावर- चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली टीका- राज्यातील सरकारमध्ये ताळमेळ नसल्याचेही पाटील यांनी केला आरोप
सोलापूर : शिवसेनेत हिंमत असेल तर एकट्याने निवडणूक लढवून दाखवावी असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.
सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या विजयाबद्दल शरद पवार आणि उद्धव ठाकरे आनंद व्यक्त करीत आहेत. शेजारच्या घरात मुलगा झाला म्हणून आपण पेढे वाटण्याचा हा प्रकार आहे. शिवसेनेने सामनातून आमच्यावर टीका करण्याऐवजी राज्यात एकट्याने निवडणूक लढवून दाखवावी. राज्यातील सरकारमध्ये ताळमेळ नाही. त्याचा परिणाम कायदा व सुव्यवस्थेवर झाला आहे. महिलांवर रोज कुठे ना कुठे अत्याचार होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.