शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारची सत्ता न आल्यास ऊस उत्पादक शेतकºयांना गळफास घ्यावा लागेल; सहकारमंत्र्यांनी व्यक्त केली भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 10:08 IST

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचाराचा शुभारंभ भंडारकवठे येथून करण्यात आला.

ठळक मुद्देकाँग्रेसवाले अलीकडे बाजार समितीच्या निवडणुकीत मला हिसका दाखविल्याचा वारंवार उल्लेख करतात - सहकारमंत्रीआमच्या पालकमंत्र्यांना फसविले, त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला - सहकारमंत्रीशेतकºयांची फसवणूक करणाºया कोणाचीही गय केली जाणार नाही. फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्यास व्यापाºयांचे परवाना रद्द करू - सहकारमंत्री

सोलापूर : साखरेला किमान आधारभूत किंमत जाहीर केल्यामुळे साखर कारखानदारीला काहीअंशी स्थिरता आली आहे. भविष्यात इथेनॉल निर्मितीवर भर दिला जाईल; मात्र केंद्रातील मोदी सरकार जर सत्तेतून पायउतार झाले तर ऊस उत्पादक शेतकºयांचे हाल होतील, त्यांना गळफास घ्यावा लागेल अशी भीती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी सकाळी भंडारकवठे येथून करण्यात आला. ख्वाजा कुतुबुद्दीन दर्गाह आणि पीर महासिद्ध   मंदिरात श्रीफळ वाढवून हा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर झालेल्या प्रचारसभेत सहकारमंत्री देशमुख बोलत होते. 

वर्षानुवर्षे शेतकºयांची फसवणूक करणारे,  त्यांची पिळवणूक करणारे आता सत्ता गेल्यानंतर शेतकºयांच्या नावावर गळा काढत आहेत. शेतकºयांच्या प्रश्नांचे भांडवल करून पुन्हा सत्तेत येऊ पाहत आहेत, असा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर करताना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दोन्ही काँग्रेसला आता शेतकरी फसणार नाहीत, असा दावाही केला. 

ते म्हणाले, पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिसळण्याचे धोरण तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम  नाईक यांनी स्वीकारले होते. काँग्रेसच्या काळामध्ये ते धोरण गुंडाळण्यात आले. त्यामुळेच ऊस उत्पादकांची अवस्था दयनीय झाली आहे. 

डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी मानव कल्याणासाठी आपली उमेदवारी असल्याचे सांगितले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस हणमंत कुलकर्णी, मंद्रुपच्या सरपंच कलावती खंदारे, नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर मैंदर्गी मठाचे शांतवीर महास्वामी, मनीष देशमुख , सभापती सोनाली कडते , उपसभापती संदीप टेळे, झेडपी सदस्या प्रभावती पाटील, रामप्पा चिवडशेट्टी, आप्पासाहेब पाटील -वडकबाळकर, सरपंच मीनाक्षी जंगलगी,  गौरीशंकर मेंडगुदले आदींची उपस्थिती होती .

हमीभावाचा कायदा गुंडाळला- शेतीमालाला हभीभाव देण्याचा कायदा १९६३ साली अस्तित्वात आला.  बाजार समितीचे संचालक आणि व्यापारी यांचे लागेबांधे असल्याने शेतकºयांच्या पिळवणूक करण्यासाठी कायदा गुंडाळून ठेवला. हमीभावापेक्षा कमी भाव देणाºया किती व्यापाºयांचे परवाने रद्द केले असा सवाल सहकारमंत्री देशमुख यांनी केला. यापुढच्या काळात शेतकºयांची फसवणूक करणाºया कोणाचीही गय केली जाणार नाही. फसवणूक केल्याचे सिद्ध झाल्यास व्यापाºयांचे परवाना रद्द करू. त्याचे अधिकार आता सरकारकडे घेण्यात येणार आहेत.

काँग्रेसवाल्यांनी पालकमंत्र्यांना फसविले- काँग्रेसवाले अलीकडे बाजार समितीच्या निवडणुकीत मला हिसका दाखविल्याचा वारंवार उल्लेख करतात.त्यांनी  आमच्या पालकमंत्र्यांना फसविले, त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला म्हणून ते सारे घडले.अजूनही माझ्या हातात खूप आहे.त्यांनी समितीच्या आणि शेतकºयांच्या हिताचे प्रस्ताव द्यावेत केवळ अंतर्गत रस्त्याचे नकोत असा सल्लाही सहकारमंत्र्यांनी दिला. 

टॅग्स :Solapurसोलापूरsolapur-pcसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSubhash Deshmukhसुभाष देशमुखSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीBJPभाजपा