वीज बिलाचा चेक बाऊन्स झाल्यास आता भरावा लागणार ८८५ रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 06:42 PM2021-08-10T18:42:11+5:302021-08-10T18:42:17+5:30

महावितरणचा शॉक - ऑनलाइन पेमेंटवर भर देण्याचे केले आवाहन

If the electricity bill check bounces, you will now have to pay a penalty of Rs 885 | वीज बिलाचा चेक बाऊन्स झाल्यास आता भरावा लागणार ८८५ रुपयांचा दंड

वीज बिलाचा चेक बाऊन्स झाल्यास आता भरावा लागणार ८८५ रुपयांचा दंड

googlenewsNext

सोलापूर - साेलापूर जिल्ह्यातील महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांनी वीज बिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेशांपैकी दरमहा सुमारे ३०० ते ५०० चेक चेक बाऊन्‍स होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक वीज बिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटी करासह ८८५ रुपयांचा दंड आता ग्राहकांना वीजबिलासोबतच भरावे लागणार असल्याची माहिती महावितरणच्यासोलापूर मंडलचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

अनादरित झालेल्या एकाच धनादेशाद्वारे अनेक वीज बिलांचा भरणा केलेला असल्यास प्रत्येक वीज बिलासाठी दंडात्मक रक्कम लावण्यात येत आहे. यासोबतच धनादेशाद्वारे वीज बिल भरण्याची सोय सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात येत आहे. धनादेशावर चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खात्यात संबंधित रक्कम नसणे आदी कारणांवरून धनादेश अनादरित होत असल्याचे आढळून येत आहे. धनादेश दिल्यानंतर तो क्लिअर होण्यासाठी साधारणतः तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. धनादेश दिल्यानंतर वीज बिल भरल्याची पावती त्याच दिवशी मिळत असली तरी धनादेशाची रक्कम जमा झाल्याच्या तारखेलाच वीज बिल भरणा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे मुदतीच्या एक-दोन दिवस आधी दिलेल्या धनादेशाची रक्कम मुदतीनंतर जमा झाल्याने पुढील वीज बिलामध्ये थकबाकी दिसून येत असल्याचेही पडळकर यांनी सांगितले.

-------------

जिल्ह्यातील वीजग्राहक

  • घरगुती - ६२१०१८
  • उद्योग - १८२१८
  • कृषी - ३६०८१७

----------

ऑनलाइन पेमेंट करणारे  टक्के

जुलै महिन्यात एकूण ४ लाख ६ हजार २८ ग्राहकांनी १००७०.७० कोटी रुपयांचा भरणा केला आहे. त्यापैकी १ लाख ६० हजार ५४० ग्राहकांनी ३५२२.८० कोटी रुपयांचे वीज बिल ऑनलाइनद्वारे भरले आहे. तर २ लाख ७५ हजार ४८८ ग्राहकांनी ६५४७.९१ कोटींचा भरणा केला आहे.

-----------

वीजग्राहकांची थकबाकी (कोटीत)

  • घरगुती - १०४.२६
  • उद्योग -८.५९
  • कृषी - ५५५२.४९

----------

जुलै महिन्यात ३२४ चेक गेले परत

जुलै १ ते ३१ जुलै या काळात सोलापूर शहरासोबत संपूर्ण जिल्ह्यातील ३२४ चेक बाऊन्स झाले. त्याची एकूण रक्कम आहे ५६ लाख २० हजार आहे. धनादेशावर चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खात्यात संबंधित रक्कम नसणे आदी कारणांवरून धनादेश बाऊन्स होत असल्याचे आढळून आले आहे.

------------

महावितरणचे संकेतस्थळ तसेच महावितरण मोबाईल ॲपद्वारे चालू व मागील वीज बिल पाहणे आणि त्याचा ‘ऑनलाईन’ भरणा करणे लघुदाब वीजग्राहकांसाठी घरबसल्या शक्य झाले आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बँकिंगद्वारे भरणा केल्यास वीज बिलामध्ये ०.२५ टक्के (५०० रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे. तर क्रेडिट कार्ड वगळता सर्व 'ऑनलाईन'द्वारे होणारा भरणा निशुल्क आहे.

- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर मंडल. 

 

 

Web Title: If the electricity bill check bounces, you will now have to pay a penalty of Rs 885

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.