शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या तर सर्व जण घाबरतील : सुशीलकुमार शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 16:47 IST

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे ठाम

ठळक मुद्देकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या वक्तव्यावर मी ठाम - सुशीलकुमार शिंदेभाजप किंवा मोदी यांच्यासाठी टक्कर देण्यासाठी आम्ही थकलेलो नाहीत - सुशीलकुमार शिंदेदेश व राज्यातील स्थिती पाहता अनेकजण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेले - सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाची गरज असून, माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना शरद पवार हे ८० व्या वर्षी पक्षाला वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता माझंही वय झालेले आहे. आम्ही थकलो आहोत. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी टीकेची झोड उठविली आहे.

त्याचबरोबर इतर पक्षाकडूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी शिंदे म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या वक्तव्यावर मी ठाम आहे. आम्ही आता थकलेले आहोत, हे वक्तव्य माझे वैयक्तिक असून याचा अर्थ भाजप किंवा मोदी यांच्यासाठी टक्कर देण्यासाठी आम्ही  थकलेलो नाहीत. सत्ताधाºयांसाठी लढा देण्यासाठी आम्ही अजून जवान आहोत. देश व राज्यातील स्थिती पाहता अनेकजण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस वाचविण्यासाठी शरद पवार हे या वयातही कष्ट घेत आहेत. काँग्रेसमध्येही माझ्याप्रमाणे इतर अनेक ज्येष्ठमंडळींचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष बळकट होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाले तर आमची ताकद वाढेल असे आजही मला वाटत आहे. 

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एक झाल्यास ताकद वाढेल हे खरे आहे. विलीनीकरणाबाबत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलेली भावना चांगली आहे. पण सद्यस्थितीत असं घडणं कठीण वाटते. ज्या मुद्यावरून शरद पवार बाहेर पडले हे मान्य होणं कठीण आहे. - बळीराम साठे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेSharad Pawarशरद पवारvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकsolapur-city-central-acसोलापूर शहर मध्य