शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

पाणीपुरवठा अन् दिवाबत्तीची थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित होणार

By appasaheb.patil | Published: August 28, 2021 10:32 AM

महावितरणने दिल्या ग्रामसेवक, सरपंचांना नोटिसा

सोलापूर : आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्यामुळे महावितरणने सर्वच थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई सुरु केली आहे. त्यातून शेतीचा ग्राहकही सुटलेला नाही. आता पाणीपुरवठा व दिवाबत्तीची देयके भरण्याबाबत सर्व ग्रामपंचायतींना महावितरणने नोटीसा दिल्या असून, देयके न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. बारामती परिमंडलात पाणीपुरवठ्याचे ७७२२ व दिवाबत्तीचे ११५७७ ग्राहक थकबाकीत असून त्यांच्याकडे अनुक्रमे १४७ कोटी व ८०९ कोटी इतकी थकबाकी आहे. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्रे सुरु ठेवली जाणार आहेत. 

महाराष्ट्र शासनाने गाव पातळीवरील दिवाबत्तीचे व पाणीपुरवठ्याचे वीजबिल भरण्याची १०० टक्के जबाबदारी आता ग्रामपंचायत पातळीवर सोपवली आहे. त्याकरिता शासनाने १५ व्या वित्त आयोगाचा निधी वापरण्याची सूचना ग्रामपंचायतीला केली असून, वीजबिलांसाठी सरपंच व ग्रामसेवकांना जबाबदार धरणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महावितरणने आता वीजबिलांच्या वसुलीसाठी ग्रामपंयाचतींकडे पाठपुरावा सुरु केला आहे. ग्रामपंचायतींना तशा नोटीसा सुद्धा बजावण्यात आल्या आहेत. वीजबिले भरण्यात सातत्य नसल्यामुळे थकबाकींचा आकडा वाढतच आहे. परिणामी महावितरणला कठोर कारवाई करणे भाग पडत आहे.

बारामती मंडलात पाणीपुरवठ्याचे ११२७ ग्राहक असून त्यांच्याकडे ५४ कोटी ४७ लाख, सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे ३८३३ कनेक्शन असून, त्यांच्याकडे ७६ कोटी ७९ लाख तर सातारा जिल्ह्यात २७६२ ग्राहकांकडे १६ कोटी ४२ लाखांची थकबाकी आहे. दिवाबत्तीमध्ये बारामती मंडल ३६३५ कनेक्शन व थकबाकी २८१ कोटी १९ लाख, सोलापूर जिल्हा ५७७६ ग्राहक ४५७ कोटी ८४ लाख रुपये थकबाकी तर सातारा जिल्ह्यात २१६६ ग्राहकांकडे ७० कोटी ९१ लाख रुपयांची थकबाकी आहे. 

 

महावितरणतर्फे ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा व दिवाबत्त्तीच्या देयकांबाबत पत्रव्यवहार करुन अवगत केलेले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनीही महावितरणला सहकार्य करुन आपली वीज देयके वेळेत भरावीत व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी असे आवाहन बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी केले आहे. 

 

सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्रे सुरु राहणार

घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिकसह शेतीपंपाची थकबाकी वसूली मोहीम देखील बारामती परिमंडलात सर्वत्र सुरु आहे. त्यास ग्राहकांचा प्रतिसादही मिळत आहे. हे पाहता गैरसोय व गर्दी टाळण्यासाठी सोलापूर, सातारा व बारामती मंडलातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरु ठेवली जाणार आहेत. याशिवाय ग्राहकांना महावितरणच्या मोबाईल ॲप व  www.mahadiscom.in या संकेतस्थळावरुन बिले भरण्याची सुविधा २४ तास सुरु आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरणgram panchayatग्राम पंचायतwater transportजलवाहतूक