सोलापुरातील शाॅपिंग माॅलमध्ये १८ वर्षांखालील मुले-मुलींसाठी ओळखपत्र बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 17:21 IST2021-08-18T17:21:31+5:302021-08-18T17:21:37+5:30
आयुक्तांचे आदेश : लसीकरणाची अट कायम

सोलापुरातील शाॅपिंग माॅलमध्ये १८ वर्षांखालील मुले-मुलींसाठी ओळखपत्र बंधनकारक
साेलापूर : शहरातील सर्व शाॅपिंग माॅल्समध्ये १८ वर्षे वयाेगटाखालील मुले व मुलींना प्रवेश देण्यापूर्वी वयाचे उल्लेख असलेले ओळखपत्र दाखविणे बंधनकारक राहील. ओळखपत्र नसेल तर प्रवेश देऊ नका, असे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी दिले.
काेराेनाचे लसीकरण पूर्ण झाले असेल तरच शाॅपिंग माॅलमध्ये प्रवेश देण्यात यावेत, असे आदेश आयुक्तांनी यापूर्वीच दिले आहेत. कामगार, व्यवस्थापनातील इतर लाेकांनाही लसीकरणाची अट कायम आहे. वय वर्षे १८ खालील मुलांचे लसीकरण अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे या वयाेगटातील मुले-मुलींना प्रवेश देण्यापूर्वी वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, आयकर विभागाचे पॅनकार्ड, वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक राहील. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनेविरुध्द, व्यक्तीविरुध्द कारवाई करण्यात यावी. या कारवाईचे अधिकार सहायक आयुक्त, विभागीय अधिकारी, मुख्य आराेग्य निरीक्षक यांना देण्यात आले आहेत.