शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मिळाली संधी तर काम करेन; बदली मागणाºया जिल्हा आरोग्य अधिकाºयाचा पलटवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 11:17 IST

सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाचा मुदतवाढीचा प्रस्ताव; पदाधिकारी मात्र नाराज

ठळक मुद्देजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ भीमाशंकर जमादार यांनी २ जून रोजी आरोग्य सचिवांकडे अर्ज करून प्रकृती आस्वस्थ व कौटुंबिक कारण दाखवून विनंती बदलीची मागणी केली डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. मात्र डॉ. जमादार यांच्या कार्यपद्धतीवर पदाधिकारी नाराज

सोलापूर : राज्याच्या आरोग्य सचिवाकडे बदली मागणाºया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी आता पलटवार केला आहे. मिळाली संधी तर काम करण्याची तयारी असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना म्हटले आहे. इकडे  त्यांना डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. मात्र डॉ. जमादार यांच्या कार्यपद्धतीवर पदाधिकारी नाराज असल्याने हा विषय वादातीत ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ भीमाशंकर जमादार यांनी २ जून रोजी आरोग्य सचिवांकडे अर्ज करून प्रकृती आस्वस्थ व कौटुंबिक कारण दाखवून विनंती बदलीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे ते जूनअखेर सेवानिवृत्त होत आहेत. कोरोना साथीची पार्श्वभूमी व निवृत्तीनंतर आणखी दोन वर्षे काम करण्यास संधी देण्याचे शासनाचे धोरणाचा फायदा देत डॉ. जमादार यांना डिसेंबरपर्यंत या पदावर ठेवण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी म्हटले आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या सभेत त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. त्यानंतरही आरोग्य विभाग सदस्यांच्या रडारवर राहिला. आरोग्य विभागाने खरेदी केलेले हिमग्लोबीन तपासणी यंत्र, डास मारणी यंत्राच विषय वादातीत आहे. याबाबत तक्रार करणारे सदस्य मात्र आता गप्प बसले आहेत. कोरोणाची साथ सुरू झाल्यावर जिल्हा नियोजन व आमदारांनी डॉक्टर, आरोग्य कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी साहित्य खरेदीसाठी निधी दिला. मात्र साहित्य खरेदीसाठी प्रशासनाकडून दोन महिने दिरंगाई झाली. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीत या खरेदी प्रकरणाची चौकशी करण्याचा ठराव झाला आहे. मात्र त्यानंतर वेगाने हालचाली झाल्या. फायलीवर सह्या झाल्या व साहित्याची खरेदी सुरू झाली आहे. खरेदी नियमानुसार केल्याने चौकशीत काहीही निष्पन्न होणार नाही असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे आरोग्य साहित्य खरेदी विलंबाच्या चौकशीची मागणी करणाºया उमेश पाटील यांच्या वैयक्तिक कार्यक्रमाला डॉ. जमादार यांनी हजेरी लावल्याने अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे यांच्यासह अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्याची झेडपीत चर्चा आहे.   -----------पदाधिकारी आहेत नाराज...अधिकारी काहीच ऐकत नसल्याने पदाधिकारी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात नाराज मंडळीची बैठक झाली. यात अधिकाºयांनाच बदलण्याचे ठराव आणण्यावर चर्चा झाली. त्यानंतर झालेल्या घडामोडीवर हा विषय आता मागे पडल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाºयांनी विरोधकांना गाठल्याने झेडपीत सत्तेवर असलेल्यांचा नाईलाज झाला आहे. दुसरीकडे अधिकाºयांअंतर्गत कारवाई झालेला एक गट सक्रीय झाला असल्याची चर्चा आहे.--------------कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी जे नियोजन व्हायला हवे होते, ते डॉ. भीमाशंकर जमादार यांना करता आलेले नाही. त्यामुळे मी त्यांच्या कामावर असमाधानी आहे. त्यांना मुदतवाढीचा प्रश्नच येत नाही.- दिलीप चव्हाण, सभापती, आरोग्य समिती

वैयक्तिक कारणासाठी बदली अर्ज दिला होता. कार्यकारी पदाबाबत न्यायालयाने दिलेला निर्णय असला तरी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर निवृत्तीनंतरही सेवा करण्यास परवानगी देण्याबाबत शासनाने परिपत्रक काढले आहे. त्यानुसार संधी मिळाली तर हरकत नाही.डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदTransferबदली