दुधाला दरवाढ मिळाल्यानंतर आमदारकीचे बघेन - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 03:50 IST2020-08-18T03:49:59+5:302020-08-18T03:50:14+5:30

दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी बंद करा, भुकटीसाठी निर्यात अनुदान द्यावे, अशी मागणी करीत दुधास दरवाढ मिळाल्यावर आमदारकीचे बघेन, असे स्पष्टीकरण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिले.

I will see MLA after getting milk price hike - Raju Shetty | दुधाला दरवाढ मिळाल्यानंतर आमदारकीचे बघेन - राजू शेट्टी

दुधाला दरवाढ मिळाल्यानंतर आमदारकीचे बघेन - राजू शेट्टी

सोलापूर : राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रतिलीटर पाच रुपयांचे अनुदान द्यावे. दूध भुकटी आयातीचा निर्णय रद्द करा, दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी बंद करा, भुकटीसाठी निर्यात अनुदान द्यावे, अशी मागणी करीत दुधास दरवाढ मिळाल्यावर आमदारकीचे बघेन, असे स्पष्टीकरण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिले.
दूध दरवाढ, अनुदान व विविध मागण्यांसाठी संघटनेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ मात्र हा मोर्चा पोलिसांनी अडविल्यामुळे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौकात विसर्जित करण्यात आला़

Web Title: I will see MLA after getting milk price hike - Raju Shetty