शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून करणाºया शिक्षक पतीस जन्मठेप, सोलापूर सत्र न्यायालयाचा निकाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 10:55 IST

सत्र न्यायालय : वैद्यकीय अधिकाºयांची साक्ष महत्त्वपूर्ण

ठळक मुद्दे आरोपीने खून हा पूर्वनियोजन पद्धतीने घडवून आणला डॉक्टर, तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या

सोलापूर : पत्नीचा खून करून खोटी फिर्याद देणाºया ठाणे महानगरपालिका शाळेतील शिक्षक सुभाष भोसले याला जिल्हा न्यायाधीश एस. एम. पाटील यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 

खटल्याची पार्श्वभूमी अशी की, आरोपी सुभाष निवृत्ती भोसले (वय ५०, रा. संजय नगर, बाबाजी पाटील वाडी, मुंब्रा ठाणे) हा ठाणे महानगरपालिका शाळा क्र. ८१ येथे वरिष्ठ शिक्षक म्हणून कार्यरत होता. सासूला माकड चावल्याने तिला पाहण्यासाठी तो दि. २८ मे २०१४ रोजी सायं. ५ वा. पत्नी सुनंदा हिला मुंब्रा येथून मोहोळ तालुक्यातील मसले चौधरीकडे कारमधून जात होता. टेंभुर्णी येथे एस.टी. स्टॅन्डसमोर एक तास आराम करून पुन्हा फ्रेश होऊन पुढील प्रवासाला निघाला.

टेंभुर्णीपासून ९ कि.मी. अंतरावर सापटणे गावाजवळ पहाटे ३ च्या सुमारास पाठीमागून अज्ञात कारमधून दोन इसम आले. त्यांनी सुभाष भोसले याची कार अडवली. मला बाहेर काढून सोने व रोख रक्कम असा एकूण ६० हजार रुपये काढून घेतले. दरम्यान, पत्नी सुनंदा उठली व तिने कसले पैसे असे विचारले असता अज्ञात इसमांनी मारहाण केली व अंगावरचे दागिने काढून घेतले. त्यानंतर आम्हा नवरा-बायकोला कारमध्ये घालून खड्ड्यात ढकलून दिले.

यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला, मी सकाळी हा प्रकार एका जीपचालकाला सांगितला, अशी फिर्याद टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी या प्रकरणी तपास केला असता फिर्यादी शिक्षक सुभाष भोसले हाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. सुभाष भोसले याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. आनंद गोरे, आरोपीतर्फे अ‍ॅड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले. 

वकिलांचा युक्तिवाद...- या प्रकरणी ११ साक्षीदार तपासण्यात आले. घटनास्थळावरील पंच, इन्स्पेक्टर, पंच, मयताची नणंद व इतर मयताचे नातेवाईक हे सर्व जण फितूर झाले. यातील डॉक्टर, तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. यात सरकारतर्फे अ‍ॅड. आनंद गोरे यांनी घटनेच्या दिवशी आरोपी व त्याची पत्नीच कारमध्ये होते. आरोपीने खून हा पूर्वनियोजन पद्धतीने घडवून आणला. त्याचे वर्तन, पूर्वनियोजन, हेतू व उद्देश ठेवून केलेला खून असल्याचे त्याचे मागील वर्तनावरून व गोळा केलेल्या पुराव्यांवरून स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे फिर्यादी हा आरोपी असल्याचे दिसून येते, असा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीशांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड सुनावला. दंड न भरल्यास ६ महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली. यातील आरोपी मे २०१४ ला अटक झाल्यापासून त्याची जामीन नामंजूर झाल्यापासून तो जिल्हा कारागृहात न्यायालयीन कस्टडीमध्ये होता. 

सुनंदा ही आरोपीची तिसरी बायको...- आरोपी सुभाष भोसले याची पहिली बायको यशोदा १९९७ साली टी.बी.च्या आजाराने मयत झाली. त्यामुळे त्याने २००५ साली राजश्री यांच्यासोबत विवाह केला होता. राजश्रीने आत्महत्या केल्याने त्याच्या विरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. २०१३ मध्ये त्याने सुनंदा यांच्याशी विवाह केला. 

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयPoliceपोलिसthaneठाणेTeacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारी