दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीचा पतीने केला खून; पंढरपुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:00 IST2020-11-12T12:54:40+5:302020-11-12T13:00:32+5:30
मुलांना दिली वडिलांविरूध्द फिर्याद; पंढरपूर पोलिसात गुन्हा दाखल

दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीचा पतीने केला खून; पंढरपुरातील घटना
पंढरपूर : दारू पिण्याच्या कारणावरून पत्नी सतत बोलत असल्याचा राग मनात धरून पतीने तिचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना बुधवारी साडेतीनच्या आसपास पंढरपुरात घडली आहे. मयत महिलेचे नाव राधिका बाबा सावतराव (वय ४९, रा.जुना सोलापूर नाका झोपडपट्टी, हनुमान टेकडी गोशाळा, पंढरपूर, जि. सोलापूर) असे आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबा लक्ष्मण सावतराव हे सतत दारू पित असे. यामुळे मयत राधिका व पती बाबा यांच्यात सातत्याने भांडण होत असे. बुधवारी झालेल्या दोघांच्या भांडणाचा राग मनात धरून बाबाने घरातील लाकडे तोडण्याच्या कुऱ्हाडीने तिच्या डोक्यात घाव घालून तिला ठार मारले. याबाबत मुलगा शिवम (वय १९) याने बाबा सावतराव याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास स.पो.नि. मगदुम करीत आहेत.