गरोदर महिलेच्या पोटावर पतीने मारली लाथ; जाणून घ्या काय होते कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 14:26 IST2020-10-30T14:25:51+5:302020-10-30T14:26:55+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Husband kicks pregnant woman's abdomen; Find out what happens | गरोदर महिलेच्या पोटावर पतीने मारली लाथ; जाणून घ्या काय होते कारण

गरोदर महिलेच्या पोटावर पतीने मारली लाथ; जाणून घ्या काय होते कारण

सोलापूर : गरोदर पत्नीच्या पोटावर लाथ मारणाºया पती, दीर यांच्याविरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ याबाबत सुनीता आकाश जाधव (वय २२, रा़ सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर ४ ) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फियार्दी सुनीता या गरोदर असल्यामुळे आपल्या आईकडे राहण्य़ास गेल्या होत्या़, तेव्हा आरोपी पती आकाश जाधव हा फिर्यादीच्या घरी जाऊन घरी चल तू, या बायकांबरोबर संबंध ठेवू नको, असे म्हणत होता़. तेव्हा फिर्यादीने मी गरोदर आहे, आता येऊ शकत नाही, असे म्हणाल्याने आकाशने अश्लील भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहाण करत पोटावरही लाथ मारली आणि फिर्यादीच्या आईच्या घरात प्रवेश करून घरातील साहित्यांची तोडफोड केली़. माजू शंकर जाधव व अंजली माजू जाधव यांनीही मारहाण केली असे सुनीता जाधव यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. यावरून आरोपी आकाश जाधव, माजू जाधव, अंजली जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे़. घटनेचा तपास पोलीस नाईक वाघमारे हे करत आहेत.

Web Title: Husband kicks pregnant woman's abdomen; Find out what happens