शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

अजून किती दिवस सतरंज्या उचलणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:23 IST

‘खाकी’ अन् ‘खादी’चं नातं तसं अगम्य, अनाकलनीय. कधी या ‘खाकी’वाल्यांच्या आंदोलनातल्या सतरंज्या उचलण्याचं कामही ‘खाकी’ करेल... तर कधी त्यास ...

‘खाकी’ अन् ‘खादी’चं नातं तसं अगम्य, अनाकलनीय. कधी या ‘खाकी’वाल्यांच्या आंदोलनातल्या सतरंज्या उचलण्याचं कामही ‘खाकी’ करेल... तर कधी त्यास संधी मिळताच याच ‘खादी’ला ‘आत’मध्ये चादरीत गुंडाळून ‘करेक्ट कार्यक्रम’ही ही ‘खाकी’ करेल... म्हणूनच या विस्मयजनक नात्याचा उलगडा आजच्या ‘लगाव बत्ती’त...

शेळके, तुमचा ‘उंबरजे-पवार’ व्हायला नको !

बार्शीला राडा तसा नवा नाही. मात्र, परवा भरचौकात जे घडलं ते बार्शीकरांसाठी धक्कादायक होतं. राऊत चाळीजवळच्या भोसले चौकात एक पोलीस ऑफिसर आमदारांना नडताना लोकांनी पहिल्यांदाच पाहिलेला. हे आमदारही कुणी साधे-सुधे नव्हते. इथल्या राजकारणातले जायंट किलर होते. प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढून मार्केट कमिटीपासून आमदारकीपर्यंत एकहाती सत्ता आणणारे किंगमेकर होते. त्यासाठी त्यांना आयुष्यातली वीस-पंचवीस वर्षे खर्चावी लागली होती. साम, दाम, दंड अन् भेदचा पुरेपूर वापर करत त्यांनी हा राजकीय दरारा निर्माण केला होता. कुणी याला ‘दहशत’ म्हणतं हा भाग वेगळा.

मात्र, हा दरारा पुरता मोडीत काढण्याचं काम या ऑफिसरनं केलं. ‘माझ्याशी वाद घालायचं काम नाही; म्हणत-म्हणत तब्बल पाच मिनिटं हा ऑफिसर आमदाराला सर्वांसमक्ष चांगलाच रेटत होता. ‘तोंडावरचा मास्क’ अन् ‘जिभेवरचा संयम’ ढळू न देणारे ‘राजाभाऊ’ प्रचंड अस्वस्थ झाल्याचं स्पष्टपणे दिसत होतं. कोणत्याही क्षणी त्यांचं मूळ रूप या ऑफिसरला दिसणार, अशी शंका लोकांना येऊ लागली होती. मात्र, ‘सभ्य’ पार्टीच्या वळचणीला गेल्यापासून ‘संस्कृतपणा’चा आणलेला आव व्हिडिओत न दिसण्याची केविलवाणी धडपड शेवटपर्यंत जाणवत होती.

असो. ‘राजाभाऊं’ना ‘डिपार्टमेंट’ तसं नवं नाही. असे कैक ऑफिसर म्हणे त्यांनी पूर्वी सहजरीत्या हॅण्डल केलेले. गेल्या वर्षी छडी उगारत रुबाबात फिरणारे ‘गिरीगोसावी’ याच ‘राजाभाऊं’च्या विवाह सोहळ्यात सफारी घालून फिरलेले जे झुकले नाहीत, त्यांचा ‘उंबरजे-पवार’ झालेला कदाचित या नवीन ऑफिसरला माहीत नसावं. मात्र, हा अधिकारीही पूर्वी ‘पुरंदर’मध्ये ‘शिवतारें’ना, तर जतमध्ये ‘सावंतां’ना नडलेला. ‘जॉईन’ झाल्यानंतर सहा-सात महिन्यांतच दुसऱ्या पोलीस ठाण्याला बदली होण्याची म्हणे त्यांना सवय झालेली. बार्शी आल्यानंतर सरकारी बंगला मिळेपर्यंत एखाद्या डिलक्स लॉजमध्ये राहण्याऐवजी मंदिरातच त्यांनी मुक्काम ठोकलेला असे. हे ‘शेळके’ मुद्दामच इथं पाठविले गेले असल्याची माहितीही कदाचित ‘राजाभाऊं’ना नसावी.

समोरच्या अधिकाऱ्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ‘झुंडशाही’चा वापर करणं हा तसा राजकारण्यांचा आवडता छंद. या ‘शेळकें’ना नमविण्यासाठीही कदाचित झुंडी बाहेर पडतील. अनेक संघटनांच्या लेटर हेडचाही पुरेपूर वापर होईल. मात्र, सध्याचे वरिष्ठ पोलीस ऑफिसर त्याच्याही पुढचे निघालेत. ‘लोढा’सह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची ‘हिस्ट्री’ त्यांनी आता उकरून काढायला सुरुवात केलीय. जुन्या फायलींवरची धूळ झटकली जाऊ लागलीय.

‘आमदार-पीआय’च्या वादाचा व्हिडिओ नेमका कुणी व्हायरल केला, याचीही उत्सुकता बार्शीकरांना. कारण या ठिकाणी दोघांनीच मोबाईल कॅमेरे ऑन केलेले. एक पोलीस, दुसरे खुद्द ‘राजाभाऊं’चेच कार्यकर्ते. खरंतर या ठिकाणी ‘आंधळगावकर’ असते तर त्यांनी थेट नेहमीप्रमाणं ‘एफबी लाईव्ह’ केलं असतं. असो. ‘एका साध्या इन्स्पेक्टरची कशी जिरवली ?’ या डॉयलॉगवर टाळ्या देत व्हिडिओ व्हायरल करणारे विरोधकही खूप ‘साव’ आहेत असं नव्हे. फक्त या मंडळींची ‘दादागिरी’ आर्थिक क्षेत्रात जास्त. ‘भोगवती’चे भोग कुणी केले... ‘डीसीसी’ची डिश कुणी चाटूनपुसून खाल्ली हे सविस्तर केवळ ‘दिलीपराव’च सांगू शकतील. जागांच्या ‘स्कीम’मध्ये ‘स्कॅम’ कसं झालं, याचा खुलासाही ‘मिरगणे’च देऊ शकतील. ‘खाणी’त किती ‘गाळा’ मारला गेला, याचा तपासही ‘आंधळकर’च करू शकतील. हे तर पूर्वाश्रमीचे ऑफिसर. मात्र, ‘खाकी’ जाऊन अंगावर ‘खादी’ येताच यांचीही भाषा आश्चर्यकारकपणे बदलली. लगाव बत्ती...

लेडीज बॉस... पुरुषी मानसिकता

गेल्या आठवड्यात ‘धनुष्यबाण’वाल्या ‘खंदारें’नी थेट ‘एसपीं’वर ‘उत्तम’पणे टीका केली. ते आल्यामुळेच अन्याय-अत्याचार वाढले, असा गंभीर आरोप करत त्यांनी एका प्रमुखाच्या हेतूवरच संशय घेतला. अशा राजकीय नेत्यांच्या आरोपांची ‘सातपुतें’नाही पूर्वीपासून सवय.. त्या साताऱ्यात असताना ‘शंभूराज’ होम मिनिस्टरबरोबर रंगलेली ‘खुन्नस’ अवघ्या महाराष्ट्राला माहीत. म्हणूनच त्यांच्या दृष्टीनं ‘खंदारे’ म्हणजे ‘शंभूराज’ यांची सोलापूर आवृत्ती.

‘महिला बॉस’बद्दल हाताखालच्या सहकाऱ्यांची ‘पुरुषी मानसिकता’ कधी-कधी जाहीरपणेही प्रकटत असते. बार्शीत ‘संडे ऑफ’च्या वेळेस ‘गिरीगोसावीं’नी याच ‘एसपीं’ची ‘माळ’मधली आठवण सांगितली होती. मात्र, तो ‘डॉमिनेटिंग टोन’ अनेकांनी व्हिडिओतून पाहिलेला. काहीजणांना तो खटकलेला. मात्र, अशा पुरुषी मानसिकतेला ‘तेजस्वी’पणे पुरून उरलेल्या असाव्यात ‘एसपी’.

‘ढेंगळें’ची ‘पाटीलकी’ खटकलेली...

सोलापूरच्या स्मार्ट सिटीतही नेते विरुद्ध अधिकारी चित्र दिसू लागलंय. खरंतर ‘ढेंगळे-पाटील’ आल्यापासून शहरातील कामं खूप फास्ट झाली. पूर्णत्वावर निघाली; मात्र नोकरदार काम करताना त्यांनी फक्त ‘ढेंगळे’ म्हणून राहायला हवं होतं. त्यांच्यातला ‘पाटलांचा रुबाब’ इतर राज्यकर्त्यांना बिलकुल आवडला नाही. सतत ‘बघून घेतो’ ‘फरक पडत नाही’ची भाषा सहज आली नाही. म्हणूनच ‘मोदीं’पर्यंत त्यांचा विषय पोहोचतोय. खरंतर ‘इंद्रभवनमध्ये कमिशन’ म्हणून स्थानापन्न होण्याचं त्यांचं मोठ्ठं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तिकडं ‘अजितदादां’इतकंच इकडं दोन्ही ‘देशमुखां’नाही मस्का मारावा लागणार हे निश्चित. नाहीतरी त्यांच्या स्मार्ट खात्यात ‘मलई’ भरपूर वाटल्यास ‘स्ट्रीट आर्ट’च्या कामात कितीचा रंग ‘ओरपला’ गेला हे ‘कंटीकर’सारखी मंडळीही सांगू शकतील. यावर सविस्तर निवांत कधीतरी.. तोपर्यंत लगाव बत्ती...

‘विजयदादा’ अन् आयएएस लॉबी

इकडं झेडपीतील ‘अकलूजकरां’च्या गटातही थेट ‘कलेक्टरां’च्या हेतूवर प्रश्नचिन्ह उभं केलं. ते म्हणे सत्ताधाऱ्यांमध्ये नोकर असतात. त्यांच्याच कलानं काम करतात, असा दावा या गटानं ‘अपात्रता सुनावणी’त केलाय. खरंतर अनेक दशकं मंत्री असलेल्या ‘विजयदादां’ना या ‘आयएएस’ लॉबीची टेन्डन्सी पुरती ठाऊक. तरीही विरोधकाच्या खुर्चीत बसल्यावर त्यांना या मानसिकतेचा साक्षात्कार व्हावा हीही म्हणे आश्चर्याची गोष्ट.