शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

हे असं कसं काय; अँटिजेन टेस्टमध्ये दोघे निगेटिव्ह, स्वॅब टेस्टमध्ये मात्र पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 12:06 IST

सोलापूर शहरातील प्रकार : नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना दक्षतेचे आदेश

ठळक मुद्देरॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट होतेशहरात गेल्या आठ दिवसांत कोरोनाची लक्षणे असलेल्या ३५ रुग्णांची अँटिजेन टेस्ट निगेटिव्हअँटिजेन टेस्टच्या अहवालावर दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे तज्ज्ञ शंका उपस्थित करीत आहेत

सोलापूर : कोरोनाची लक्षणे असलेल्या दोन रुग्णांचा अँटिजेन टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र स्वॅब टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्याचा प्रकार सोलापुरातही घडला आहे. त्यामुळे मनपाचा आरोग्य विभाग कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची पुन्हा स्वॅब टेस्ट करण्यावर भर देत आहे.

जिल्ह्यात कोरोनाची दोन प्रकारे टेस्ट केली जात आहे. घशातील स्रावाचे नमुने (स्वॅब) घेऊन कोरोनाची टेस्ट केली जाते. या टेस्टचा अहवाल मिळायला २४ तासांपेक्षा अधिकचा कालावधी लागतो. यादरम्यान, रॅपिड अँटिजेन टेस्ट सुरू झाल्या. या टेस्टमध्ये अर्ध्या तासात अहवाल मिळतो, परंतु या अँटिजेन टेस्टच्या अहवालावर दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे तज्ज्ञ शंका उपस्थित करीत आहेत. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले.

रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट होते ; मात्र एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. अँटिजेन टेस्टमध्ये या व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास आम्ही तिथेच थांबत नाही. या व्यक्तीची तत्काळ स्वॅब टेस्टही केली जाते. शहरात गेल्या आठ दिवसांत कोरोनाची लक्षणे असलेल्या ३५ रुग्णांची अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आली. या सर्वांची स्वॅब टेस्ट केली असता त्यातील केवळ दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आगामी काळातही या पद्धतीनेच काम होईल.

अँटिजेन ही स्क्रीनिंग टेस्ट असल्यासारखीच आहे. त्यामुळे त्याबद्दल दक्षता घेतच आहोत. कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची त्यामुळेच तर पुन्हा स्वॅब टेस्ट घेण्यावर भर दिला जात आहे. सर्व नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना याबाबत सूचनाही दिल्या आहेत.-डॉ. मंजिरी कुलकर्णी, आरोग्य अधिकारी, मनपा. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्यSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका