धक्कादायक! पंढरपुरातील एक घर पेट्रोल टाकून दिले पेटवून; तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 12:39 IST2025-05-01T12:39:09+5:302025-05-01T12:39:40+5:30

इसबावी (पंढरपूर) येथील परिसरातील एक घर रात्री अडीच ते तीनच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना गुरूवारी पहाटे घडली आहे.

house in Pandharpur was set on fire by pouring petrol; three injured | धक्कादायक! पंढरपुरातील एक घर पेट्रोल टाकून दिले पेटवून; तिघे जखमी

धक्कादायक! पंढरपुरातील एक घर पेट्रोल टाकून दिले पेटवून; तिघे जखमी

पंढरपूर : इसबावी (पंढरपूर) येथील परिसरातील एक घर रात्री अडीच ते तीनच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना गुरूवारी पहाटे घडली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घरात झोपलेले तिघे जखमी झाले असून घरातील साहित्यांचे जळून नुकसान झाले आहे.

इसबावी (पंढरपूर) येथील परिसरातील बसवेश्वर नगर येथील नागनाथ कदम यांचे कुटुंब उन्हाळा असल्याने घराचे खिडकी उघडी सोडून झोपले होते. यामध्ये नागनाथ कदम, सुनिता कदम, नितेश कदम, योगेश कदम व शुभम कदम यांचा समावेश होता. ते सर्व झोपलेले असताना गुरुवारी पहाटे अज्ञात व्यक्ती त्या ठिकाणी आला. त्याने खिडकीतून घरात पेट्रोल फेकले आग लावून दिली. यामुळे  तीनजण गंभीरित्या जखमी झाले आहेत.

घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. ही माहिती आजूबाजूच्या नागरिकांनी पोलीस व नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला कळवले. त्यानंतर प्रशासनाने आग आग विझवून सर्वांना बाहेर काढले. तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे नितेश कदम यांनी सांगितले. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

Web Title: house in Pandharpur was set on fire by pouring petrol; three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.