शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अकलूजचा घोडेबाजार तेजीत : ४.६० लाखांना विकला गेला मारवाड घोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 07:33 IST

एव्हाना राजकीय घोडेबाजार सर्वांनाच ठाऊक असतो. शिवाय, लोकसभा व त्यापाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे घोडामैदान जवळ येऊन ठेपले आहे.

- राजीव लोहकरेअकलूज (जि. सोलापूर) : एव्हाना राजकीय घोडेबाजार सर्वांनाच ठाऊक असतो. शिवाय, लोकसभा व त्यापाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे घोडामैदान जवळ येऊन ठेपले आहे. पण अकलुजात भरणाºया खºयाखुºया घोडेबाजारात उद्घाटनापूर्वीच २ कोटी १० लाखांची उलाढाल झाल्याने सध्या हा घोडेबाजार चर्चेत आहे. एका मारवाडी घोड्याने तर चांगलाच भाव खाल्ला. ४.६० लाखांत हा घोडा विकला गेला.येथील कृषी उत्पन्न बाजार समिती दरवर्षी दिवाळीत घोडेबाजार भरवते. हा बाजार नावाजलेला असल्याने देशाच्या कानाकोपºयातून घोड्यांचे जाणकर आणि हौशी खरेदीदारांची मोठी मांदियाळी असते. यंदा या बाजारात विविध जातींचे १ हजार ४८० घोडे दाखल झाले आहेत.देशभरात कोणत्याही घोडेबाजारात पंजाब, मारवाडी, काटियावाडी या घोड्यांच्या तीन जातींची हुकूमत चालते. सर्वसामान्यांना घोड्यांची जात व त्यांची खासियत समजत नाही.परंतु घोडेशौकीन रंग, उंची व शारीरिक ठेवणीवरून घोड्यांची अचूक पारख करतात. मारवाड जातीचे घोडे पाच ते साडेपाच फूट उंच, दिसायला आकर्षक व टोकदार कानाचे असतात. काटियावाडी घोडा दिसायला तजेलदार आणि भारदस्त असतो. तर पंजाबी नुक्रा जातीचा घोडा पांढराशुभ्र व तेजस्वी असतो. अकलूजच्या घोडेबाजारात या तिन्ही जातींच्या घोड्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.मारवाड घोडा झाला मराठीअकलूजच्या या घोेडेबाजारात कमीत कमी दीड लाखापासून घोड्यांची खरेदी होत आहे. आतापर्यंत सर्वात जास्त ४.६० लाखांना मारवाडी घोड्याची विक्री झाली आहे. उत्तर प्रदेशातील छोटाबकील यांचा हा घोडा अहमदनगरच्या प्रवीण शिंदेंनी घेतला. उत्तर भारतातील बरेली येथील खलील महमूदयांचा पंजाबी नुक्रा जातीचा घोडा उस्मानाबादच्या सुनील पाटील यांनी घेतला.

टॅग्स :Solapurसोलापूर