शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! पत्नीला सासरी न पाठवणाऱ्या सासऱ्याचा खून; नंतर अंगाला रक्त लावत बसला जावई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 16:57 IST

आवाज आल्याने वडिलांना सोडवण्यासाठी गेलेला मेहुणा अभिजीत मासाळ व सासू आशा मासाळ या दोघांनाही जावयाने चाकू भोसकून गंभीर जखमी केले.

Solapur Crime : पत्नीला नांदायला पाठवत नाहीत आणि माझ्याविरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे, या गोष्टीचा राग मनात धरून जावयाने सासुरवाडीत जाऊन घराच्या अंगणात झोपलेल्या सासऱ्याचा चाकूने वार करून जावयाने खून केला. तसंच मध्यस्थीसाठी आलेल्या मेहुणा व सासूवरही चाकूने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी येथील काळे वस्तीवर २७ एप्रिल रोजी रात्री घडली. बापूराव तुळशीराम मासाळ असे मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अभिजीत बापूराव मासाळ यांच्या फिर्यादीवरून मंगेश देविदास सलगर याच्याविरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बापूराव यांच्या मुलीचा विवाह कोळेगाव येथील मंगेश याच्याशी झाला होता. दरम्यान मागील तीन वर्षांपासून मंगेश याची पत्नी निशा आई-वडिलांकडेच राहत होती. याशिवाय जावयाच्या विरोधात न्यायालयात दावाही दाखल केला होता. या रागाच्या भरातच २७ एप्रिल रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास बापूराव मासाळ हे घराच्या बाहेर अंगणात झोपले होते, तर मेहुणा अभिषेक मासाळ हा गोठ्यात झोपला होता व सासु आशा मासाळ या घरात झोपल्या होत्या. आरोपीने धारदार चाकूने सासऱ्याच्या तोंडावर, अंगावर व पायावर भोकसून वार करून जिवे ठार मारले. आवाज आल्याने वडिलांना सोडवण्यासाठी गेलेला मेहुणा अभिजीत मासाळ व सासू आशा मासाळ या दोघांनाही चाकू भोसकून गंभीर जखमी केले.

घटनास्थळी पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे, पोलिस उपाधीक्षक संकेत देवळेकर, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी भेट दिली. फॉरेन्सिक लॅबच्या टीमने त्या ठिकाणचे फिंगरप्रिंट्स घेतले आहेत. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.

आरोपी हा अंगाला रक्त लावत बसला होताआरोपी हा घटनास्थळावरून निघून न जाता तिथे सांडलेल्या रक्ताच्या थारोळ्यातील रक्त स्वतःच्या अंगाला लावून तेथेच बसला होता. पोलिस स्टेशनच्या ११२ वर कॉल करून मला या ठिकाणी पाच-सहा जणांनी मारले आहे. मला वाचवायला ताबडतोब या, असा कॉल करून जागीच थांबला होता.

घरात लगीन घाई सुरू होतीमंगेशची पत्नी निशा घरातच होती. भीतीपोटी ती बाहेर आली नाही. निशाच्या थोरल्या भावाचे लग्न ६ मे रोजी ठरले आहे. लग्नाच्या पत्रिका वाटप झाल्या होत्या. घरात लगीन घाई सुरू होती.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी