The horn broke in the morning accident, but the spine did not break, the owner just say you fight! | पहाटेच्या अपघातात मोडून पडलं शिंग,पण मोडला नाही कणा,मालक फक्त तुम्ही लढ म्हणा !

पहाटेच्या अपघातात मोडून पडलं शिंग,पण मोडला नाही कणा,मालक फक्त तुम्ही लढ म्हणा !

कुर्डुवाडी : पहाटेच्या अपघातात मोडून पडलं शिंग,पण मोडला नाही कणा,मालक फक्त तुम्ही लढ म्हणा ! असाच काहीसा विचार करत सहा बैलांपैंकी ज्याचे अपघातात शिंग मोडले असा एक बैल अगदी रवंत करीत ताडकन उठून उभा राहिला व यात आपण वाचलो असल्याच्या  अविर्भावात वावरू लागला.

त्याचे असे झालं की कुर्डुवाडी-पंढरपूर रस्त्यावर लऊळ हद्दीत शुक्रवारी पहाटे पाचच्या दरम्यान कोल्हापूरहून बीडकडे चाललेल्या (MH-42,AQ-2264)  टेम्पोला एका ट्रकने समोरच्या बाजूने कट मारल्याने व बाजूला सिमेंट रस्त्याचे काम अर्थवट असल्याने बॅलन्स गेला व त्यात टेम्पो पलटी झाला. 
यावेळी टेम्पोत असणाऱ्या ड्रायव्हरसह पाच व्यक्तींं ह्या बालांबल बचावले. त्यांंना यात काहीही लागले नाही, परंतु पाठीमागे असणाऱ्या सहा बैलांपैकी एका बैलाचेच शिंग मोडून मात्र पडले. यामध्ये इतर पाच बैलांनाही काहीही इजा झाली नाही.अपघात घडल्यानंतर काही वेळाने रस्त्यावरील क्रेनच्या साहाय्याने पलटी टेम्पो सरळ केला व तो तेथून पुढे निघून गेला. 

Web Title: The horn broke in the morning accident, but the spine did not break, the owner just say you fight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.