शहरं
Join us  
Trending Stories
1
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
2
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
3
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
4
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
5
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
6
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
7
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
8
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
9
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
10
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
11
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
12
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
13
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
14
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
15
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
16
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
17
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
19
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
20
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

हिटलर पंतप्रधान झाल्याने देशाच्या अस्तित्वाला धोका : सुजात आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 13:17 IST

सुशीलकुमार शिंदे काका तुम्ही वर्षातून किती दिवस सोलापुरात असता ते तरी सांगा? सुजात आंबेडकरांचा माजी केंद्रीय मंत्री शिदेंना प्रश्न.

ठळक मुद्देमोदींच्या रुपात एक मनुवादी हिटलर या देशाचा पंतप्रधान झाला - सुजात आंबेडकरपाच वर्षांत देशातील सार्वभौम संस्थेच्या अस्तित्वाला धक्का लावण्याचे काम सुरू झाले - सुजात आंबेडकरवंचित बहुजन आघाडीची भाजप आणि काँग्रेस या दोन शत्रूंसोबत लढाई - सुजात आंबेडकर

कुरुल : मोदींच्या रुपात एक मनुवादी हिटलर या देशाचा पंतप्रधान झाला आणि पाच वर्षांत देशातील सार्वभौम संस्थेच्या अस्तित्वाला धक्का लावण्याचे काम सुरू झाले आहे. वंचित बहुजन आघाडीची भाजप आणि काँग्रेस या दोन शत्रूंसोबत लढाई आहे. काँग्रेसने गेल्या ६५ वर्षांत मागासवर्गीय, मुस्लीम समाजाला भाजपची भीती दाखवून वापरून घेतले. समाजाच्या उन्नतीसाठी काहीही केले नाही, याचा जाब आता विचारला पाहिजे. आंबेडकर उपरे आहेत असे म्हणणाºया सुशीलकुमार शिंदे यांनी तर गेल्या ४० वर्षांत सोलापूर जिल्ह्यासाठी नेमके काय केले ते आधी सांगावे. ना मुबलक पिण्याचे पाणी, ना तरुणांना रोजगार देणारा मोठा उद्योग आणला, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केली. 

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ कुरुल येथील बाजारतळावर झालेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते. यावेळी साहिल आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन फ्रंटचे अध्यक्ष धनंजय आवारे, एमआयएमचे अध्यक्ष बिलाल शेख, शत्रुघ्न जाधव, बाळासाहेब लांडे, शशिकांत ठोकळे, विजय भालेराव उपस्थित होते. 

सुजात आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना या सगळ्या पक्षांनी धनगर समाजाला आरक्षण देतो, म्हणून आजपर्यंत फसवले आहे. प्रकाश आंबेडकर हे सोलापुरात राहत नसल्याचे शिंदे सभेत सांगतात. शिंदे काका तुम्ही वर्षातून किती दिवस सोलापुरात असता ते तरी सांगा? असा प्रश्न विचारला. 

टॅग्स :SolapurसोलापूरNarendra Modiनरेंद्र मोदीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरmadha-pcमाढा