शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणी, जवळगाव, पिंपळगाव प्रकल्प पावसाळ्यात कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 15:32 IST

बार्शी तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती; धरणातील पाण्याने शेवटची पातळी गाठल्यामुळे पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली

ठळक मुद्देवैरागसह बार्शी तालुक्यात चाºयाविना जनावरांची संख्या घटत चालली धरणक्षेत्र परिसरातील ऊस, द्राक्षे बाग व इतर फळबागांचे क्षेत्र धोक्यात काही वर्षांपूर्वी कारी व नारी परिसरात शेतकरी बांधवांनी पाण्याअभावी द्राक्षबागेला कुºहाड लावली

धनाजी शिंदे वैराग : बार्शी तालुक्यात सतत दुष्काळसदृश परिस्थिती, कमी पडणारा पाऊस यामुळे तालुक्यात भीषण पाणीटंचाई अर्थात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात याही वर्षी तुरळक ठिकाणी पाऊस पडल्याने भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हिंगणी, ढाळेपिंपळगाव व जवळगाव यांसारखे प्रकल्प आणि भोगावती, नागझरी, नीलकंठा या नद्या पावसाअभावी कोरड्याठाक पडल्या आहेत तर धरणातील पाण्याने शेवटची पातळी गाठल्यामुळे पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वैरागसह बार्शी तालुक्यात चाºयाविना जनावरांची संख्या घटत चालली आहे. धरणक्षेत्र परिसरातील ऊस, द्राक्षे बाग व इतर फळबागांचे क्षेत्र धोक्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी कारी व नारी परिसरात शेतकरी बांधवांनी पाण्याअभावी द्राक्षबागेला कुºहाड लावली़ तशीच वेळ आज हिंगणी, पिंपरी, पिंपळगाव, मळेगाव येथील द्राक्षे पिकवणाºया शेतकºयांवर आली आहे. पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या बागा पाण्याअभावी नेस्तनाबूत होणार हे पाहून शेतकरीराजा चिंतातुर व भावुक झाला आहे. वर्षभराचे नियोजन ज्या पिकावर शेतकरी करतो त्या खरिपाची पेरणी परिस्थिती नसतानाही केली आहे.

१९७२ च्या दुष्काळापेक्षाही भीषण परिस्थिती आज निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी पावसाने दिलेली हुलकावणी व याही वर्षी दिलेली ओढ यामुळे मुलांच्या शिक्षणाचा आणि जीवन जगण्याचा प्रश्न तालुक्यातील शेतकºयांपुढे निर्माण झाला आहे. जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी देखील वातावरण नसल्याने शेतकरी आणखीनच धास्तावला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी