लऊळ येथे उच्चशिक्षीत तरूणाने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 16:23 IST2018-06-20T16:23:18+5:302018-06-20T16:23:18+5:30
इंजिनिअर मुलाच्या आत्महत्यामुळे सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे़ आत्महत्याचे कारण समजु शकले नाही.

लऊळ येथे उच्चशिक्षीत तरूणाने केली आत्महत्या
सोलापूर : लऊळ (ता. माढा) येथील अभियांत्रिकी विभागाची पदवी घेतलेल्या उच्चशिक्षीत तरूणाने बुधवार सकाळी ६:१५ वाजता सकाळी राहत्या घराच्या देवघरात गळफास लावुन आत्महत्या केली. बाळासाहेब उर्फ दत्तात्रय विठ्ठल वरडोळे ( वय २७ ) असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
बाळासाहेब उर्फ दत्तात्रय वरडोळे हा नेहमीप्रमाणे पहाटे व्यायामासाठी बाहेर पडला होता़ तो घरी परत आल्यानंतर सुमारे ६:१५ च्या दरम्यान देवघरात गेला व तेथेच त्यांनी स्लॅबच्या लोखंडी हुकाला ओढणीने गळफास घेतला़ त्यातच त्याचा मृत्यू झाला़ त्यानंतर कुर्डूवाडी पोलीसांनी त्याचा पंचनामा केला व शवविच्छेदन करून लऊळ येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आला.
त्याच्या पश्च्यात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. प्रसिद्ध कापड व्यापारी विठ्ठल वरडोळे यांचा तो एकलुता एक मुलगा होता़ इंजिनिअर मुलाच्या आत्महत्यामुळे सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे़ आत्महत्याचे कारण समजु शकले नाही.