शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

हिंदू महिलेच्या नेत्रशस्त्रक्रियेसाठी रमजानच्या पवित्र महिन्यात मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 8:30 PM

मुस्लीम बांधवांची माणुसकी; उपचारासाठी १५ हजारांचा केला खर्च

ठळक मुद्देमंगल सूळ यांच्या दोन्ही डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी सुमारे १५ हजार रुपये खर्चाची रक्कम मुस्लीम बांधवांनी देऊ करीत हिंदू महिलेला दृष्टी प्राप्त करून दिली अकलूज मुस्लीम समाजातर्फे रमजानच्या पवित्र महिन्यात हिंदू महिलेला डोळ्यांच्या शस्त्रक्रियेद्वारे दृष्टी प्राप्त करून देत मानवधर्म पाळला

अकलूज : अल्लाह का हुक्म है की रमजान मे अल्लाह के बंदे ने नेक काम करना चाहिये, गरीब और भूखा किस मजहब का है? उनकी जाती कौनसी है, यह मायने  नही रखता। हाच आदर्श घेऊन अकलूज मुस्लीम समाजातर्फे रमजानच्या पवित्र महिन्यात हिंदू महिलेला डोळ्यांच्या शस्त्रक्रियेद्वारे दृष्टी प्राप्त करून देत मानवधर्म पाळला.

अकलूज येथील अनुपम आय क्लिनिकमध्ये आलेल्या मंगल सूळ या हिंदू महिलेकडे डोळ्यांच्या उपचारासाठी पैसे नव्हते. रमजानच्या पवित्र महिन्यात अकलूजच्या मुस्लीम समाजाने पवित्र असे सामाजिक कार्य करण्याचा निर्णय घेतला. यावर केवळ आश्वासन                   न देता मंगल सूळ यांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी आलेले हॉस्पिटल बिल भरून त्या महिलेला मदत करून समाजापुढे एक नवीन आदर्श ठेवला आहे.

 मुस्लीम समाज, सुनील लावंड व मकानदार यांचे त्यांनी अभिनंदन केले. मंगल सूळ यांच्या दोन्ही डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी सुमारे १५ हजार रुपये खर्चाची रक्कम मुस्लीम बांधवांनी देऊ करीत हिंदू महिलेला दृष्टी प्राप्त करून दिली आहे.

मार्गदर्शक तत्त्वांचा अंगीकार करावा : शिवतेजसिंह- मुस्लीम समाज हा कुराण शरीफच्या आदर्शावर चालत असतो. यामध्ये जकात हा असा एक शब्द आहे जो आपल्या नेक कमाईतील ठराविक हिस्सा खैरात म्हणून गरिबांमध्ये वाटतात. तसेच शेजारी कोणी उपाशी झोपले नाही ना, याची खात्री करून मगच जेवतात. अशा अनेक मार्गदर्शक तत्त्वांचा अंगीकार करायचा असतो, असे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :SolapurसोलापूरRamzan Eidरमजान ईदOrgan donationअवयव दानMuslimमुस्लीम