सोलापुरात हेल्मेटसक्ती ; एकीकडे हेल्मेट बाजारात...दुसरीकडे हेल्मेट कोर्टात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:15 PM2018-12-22T12:15:23+5:302018-12-22T12:17:45+5:30

२६ डिसेंबरला सुनावणी; जिल्हाधिकाºयांसह आरटीओ, पोलीस आयुक्तांना म्हणणे मांडण्यासाठी कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Helmattu in Solapur; Helmet market ... on the other hand Helmet Court! | सोलापुरात हेल्मेटसक्ती ; एकीकडे हेल्मेट बाजारात...दुसरीकडे हेल्मेट कोर्टात !

सोलापुरात हेल्मेटसक्ती ; एकीकडे हेल्मेट बाजारात...दुसरीकडे हेल्मेट कोर्टात !

Next
ठळक मुद्देहेल्मेट सक्तीच्या विरोधात शंभूराजे युवा संघटनेसह दिवाणी न्यायालयात दावा दाखल४८ जणांकडून १ लाख १५ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आलाजिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये शहर आणि जिल्ह्यात हेल्मेट न घालणाºयांविरुद्धची कारवाई

सोलापूर : हेल्मेट सक्तीच्या विरोधात शंभूराजे युवा संघटनेसह दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. यावर न्यायालयाने जिल्हाधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी न्यायालयाला म्हणणे सादर करावे, असा आदेश बजावला आहे. सहदिवाणी न्यायाधीश खेडकर यांच्यापुढे ही सुनावणी झाली. २६ डिसेंबर रोजी यावर सुनावणी होणार आहे. 

शंभूराजे युवा संघटनेने न्यायालयाकडे केलेल्या दाव्यात म्हटले आहे की, जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत १८ डिसेंबर रोजी रस्ता सुरक्षा समितीची बैठक पार पडली. यात त्यांनी प्रशासनाला हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी या बैठकीचा संदर्भ देत कार्यालयीन आदेश काढला. यात २५ डिसेंबरपर्यंत ५ हजार खटले दाखल करुन १०० टक्के अंमलबजावणी करावी, असे लेखी पत्र काढले होेते.  या विरोधात शंभूराजे युवा संघटनेच्या वतीने अध्यक्ष नितीन चव्हाण यांनी अ‍ॅड. संतोष होसमनी यांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरुपाचा दावा सोलापूरच्या सह दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला. 

न्यायालयासमोर दावाकर्त्याच्या वतीने बाजू मांडताना वकिलांनी प्रशासनाचा उद्देश हा नागरिकांची काळजी घेणे अथवा नाही.   हेल्मेट सक्ती करून नागरिकांवर  खटले दाखल करणे व महसूल गोळा करणे असा आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. कोणताही सारासार विचार न करता एकतर्फी आदेश पारित करणे लोकशाहीला घातक असल्याचे दाखवून दिले आहे. न्यायालयाने या बाबींचा विचार करून न्यायालयाने जिल्हाधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी २६ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेशित केले आहे.

विना हेल्मेट... १.४२ लाखांचा दंड वसूल
- दरम्यान, जिल्हाधिकाºयांच्या आदेशान्वये शहर आणि जिल्ह्यात हेल्मेट न घालणाºयांविरुद्धची कारवाई सुरुच आहे. शुक्रवारी शहरामध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि शहर वाहतूक शाखेने कारवाई केली. यात ६३ वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये ४२ जण दोषी आढळले. ४८ जणांकडून १ लाख १५ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. अकलूज विभागाच्या आरटीओ कार्यालयाने ३३ जणांची तपासणी केली. ४८ जणांचे हेल्मेट वापरण्यासाठी समुपदेशन करण्यात आले आणि २७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. दोन्ही विभागामध्ये मिळून एकूण १ लाख ४२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती सोलापूर विभागाचे  सहा. उपप्रादेशिक अधिकारी सतीश जाधव आणि अकलूज विभागाच्या अर्चना गायकवाड यांनी दिली.

Web Title: Helmattu in Solapur; Helmet market ... on the other hand Helmet Court!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.