शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर शहरात रात्रभर जोरदार पाऊस;  २४ तासात २०.८ मिलिमीटर पावसाची नोंद

By appasaheb.patil | Updated: September 1, 2022 10:52 IST

रात्रभर पडलेल्या जोरदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे.

सोलापूर : मागील पंधरा दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोलापूर शहर व परिसरात बुधवारी रात्रभर जोरदार हजेरी लावली. गुरूवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत म्हणजेच मागील २४ तासात सोलापुरात २०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, काल बुधवार गणेशोत्सवाच्या आगमनाचा दिवस होता. दिवसभर चांगलाच उकाडा जाणवत होता. सायंकाळी सातच्या सुमारास आभाळ गच्च भरले होते. साडेसातच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. कमी जास्त अशा प्रमाणात पाऊस पडत असतानाच सायंकाळी आठनंतर पावसाने चांगलाच जोर धरला. रात्रभर पडलेल्या पावसाने गुरूवारी सकाळी सहाच्या सुमारास विश्रांती घेतली. त्यानंतर सात वाजण्याच्या सुमारास सुर्यदर्शन झाले. 

रात्रभर पडलेल्या जोरदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. शहरातील सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांना वाहन चालविताना त्रास होत आहे. शिवाय ग्रामीण भागातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याने तलाव तुडूंब भरून वाहत आहेत. काल सायंकाळीच हवामान खात्याने विजांसह काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार सोलापूर शहरासोबतच परिसरातील काही गावात जोरदार पावसाने हजेरी लावली. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसwater transportजलवाहतूक