सोलापूर रेल्वेस्थानकावर उभारले हेल्थ एटीएम सेंटर; ५० रूपयांत होणार १६ प्रकारच्या चाचण्या  

By Appasaheb.patil | Published: January 16, 2020 11:41 AM2020-01-16T11:41:47+5:302020-01-16T11:44:29+5:30

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे मुख्यालय येथेच असून सोलापूर हे भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक.

Health ATM center set up on Solapur railway station; There will be 2 types of tests for 5 rupees | सोलापूर रेल्वेस्थानकावर उभारले हेल्थ एटीएम सेंटर; ५० रूपयांत होणार १६ प्रकारच्या चाचण्या  

सोलापूर रेल्वेस्थानकावर उभारले हेल्थ एटीएम सेंटर; ५० रूपयांत होणार १६ प्रकारच्या चाचण्या  

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवाशांची सेवा हीच ईश्वर सेवा मानून मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने सोलापूर रेल्वे स्थानकावर हेल्थ एटीएम सेंटर सुरूसोलापूर जंक्शन हे सोलापूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहेअवघ्या ५० रूपयात १६ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या रेल्वे स्थानकावर उपलब्ध

सोलापूर : प्रवासाला निघताना अस्वस्थ वाटतंय, किंवा घाईघाईत आरोग्याच्या काही तपासण्या राहून गेल्या अथवा अगदी सहज म्हणून आपल्याला आरोग्य तपासण्या करायच्या असतील तर ती सुविधा आता सोलापूर रेल्वे स्थानकावरच उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सोलापूर रेल्वे स्थानकावर हेल्थ एटीएम सुरू करण्यात येणार आहे. अवघ्या ५० रूपयात १६ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या सोलापूर रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ या एटीएमचा लाभ सोलापूरसह संपूर्ण देशभरातील कोणताही नागरिक घेऊ शकतो असेही मध्य रेल्वेच्या प्रशासनाने सांगितले.

सोलापूर जंक्शन हे सोलापूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे मुख्यालय येथेच असून सोलापूर हे भारतामधील १०० सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. सोलापूर रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. कुडुर्वाडी व होटगी ही जंक्शन्स जिल्ह्यात आहेत. मुंबई -चेन्नई, सोलापूर - विजापूर व मिरज - लातूर हे तीन लोहमार्ग जिल्ह्यातून गेले आहेत. कन्याकुमारी, चेन्नई, मुंबई, आग्रा, दिल्ली, हरिद्वार, भुबनेश्वर, बेंगलोर, हैदराबाद ही अनेक शहरे रेल्वेद्वारे सोलापूरला जोडली गेली आहेत. हे रेल्वेदृष्ट्या दक्षिणेचे प्रवेशद्वार आहे. या स्थानकावर दररोज हजारो प्रवाशी ये-जा करतात़ आता येणाºया प्रत्येक प्रवाशांच्या आरोग्याची काळजी रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येत आहे़ अवघ्या ५० रूपयात १६ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या होतील तपासण्या...
- मध्य रेल्वेच्या सोलापूर स्थानकावर उभारण्यात आलेल्या हेल्थ एटीएम सेंटरमध्ये अवघ्या ५० रूपयात १६ प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार आहेत़ हाडांचा मास, बॉडी मास इंडेक्स, बीपी, मेटाबोलिक एज, बॉडी फॅट, हायड्रेशन, पल्स रेट, उंची आदी १६ प्रकारच्या चाचण्या या हेल्थ एटीएम सेंटरवर करण्यात येणार आहेत़ ही तपासणी देशभरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार आहे़ ही सेवा खासगी एजन्सीमार्फत पुरविण्यात येत असल्याचेही रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले़ 

प्रवाशांची सेवा हीच ईश्वर सेवा मानून मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने सोलापूर रेल्वे स्थानकावर हेल्थ एटीएम सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे़ या एटीएमचे उदघाटन आज मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल याच्या हस्ते होणार आहे़ यावेळी विभागीय व्यवस्थापक शैलेंद्र गुप्ता यांच्यासह अन्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असणार आहेत़ या एटीएम अंतर्गत केवळ ५० रूपयात १६ प्रकारच्या चाचण्या करण्यात येणार आहेत़ याचा लाभ प्रवाशांनी घ्यावा़
- प्रदीप हिरडे 
वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर

Web Title: Health ATM center set up on Solapur railway station; There will be 2 types of tests for 5 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.