त्यानं एटीएमची अदलाबदल करुन ढापली ११ हजारांची रोकड अन् पसार
By विलास जळकोटकर | Updated: February 8, 2024 17:42 IST2024-02-08T17:41:38+5:302024-02-08T17:42:15+5:30
सोलापूर : एटीएमद्वारे व्यवहार करावयाची माहिती नसलेल्यांना हेरुन त्यांना मदत करण्याच्या हेतून फसवणुकीचे प्रकार सर्रास घडत आहेत. बाळीवेसेतील एसबीआय ...

त्यानं एटीएमची अदलाबदल करुन ढापली ११ हजारांची रोकड अन् पसार
सोलापूर : एटीएमद्वारे व्यवहार करावयाची माहिती नसलेल्यांना हेरुन त्यांना मदत करण्याच्या हेतून फसवणुकीचे प्रकार सर्रास घडत आहेत. बाळीवेसेतील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये अज्ञात व्यक्तीने एटीएम कार्ड ॲक्टिव्ह करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या एटीएम कार्डची अदलाबदल करुन त्याच्या नकळात ११ हजार ७०० रुपयांची रोकड काढून पोबारा केला. या प्रकरणी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंदला आहे. अशोक नारायण भोसले (वय ५५, रा. गुळवंची, ता. उत्तर सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
यातील फिर्यादीला एसबीआय बँकेकडून एटीएम कार्ड मिळाले होते. ते कार्ड ॲक्टिव्ह करण्यासाठी ते १६ जानेवारी २०२४ रोजी बाळीवेस येथील बँकेच्या आवारातील एटीएम सेंटरवर आले होते. तेथे मदत करण्यासाठी म्हणून आलेल्या तोतयाने त्यांच्या कार्डची अदलाबदल केली.
फिर्यादी परत गेल्यानंतर त्यांच्याकडून नकळत ढापलेल्या कार्डद्वारे त्यांच्या खात्यातील ११ हजार ७०० रूपये काढून फिर्यादीची फसवणूक केली. बँकेत गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला, त्यानुसार जोडभावी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदला आहे. तपास हवालदार पवार करीत आहेत.