प्लाॅट घेण्यासाठी ३६ लाख रूपये आणण्यासाठी पत्नीचा छळ; पाच जणांवर गुन्हा
By रूपेश हेळवे | Updated: May 10, 2023 16:09 IST2023-05-10T16:08:48+5:302023-05-10T16:09:33+5:30
फिर्यादी रुबीना यांचे अनिस अहमद याच्याशी २०१४ मध्ये विवाह झाला होता.

प्लाॅट घेण्यासाठी ३६ लाख रूपये आणण्यासाठी पत्नीचा छळ; पाच जणांवर गुन्हा
सोलापूर : प्लॉट घेण्यासाठी माहेरून ३६ लाख रूपये घेऊन ये म्हणत पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत रुबीना अनिस अहमद ( वय ३५, रा. गुरू राघवेंद्र नगर, मुळेगाव रोड) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली आहे.
फिर्यादी रुबीना यांचे अनिस अहमद याच्याशी २०१४ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर फिर्यादी नांदण्यासाठी आल्यानंतर सासरच्या मंडळींनी फिर्यादीला तुझ्या आई वडिलांनी आम्हाला मनाप्रमाणे हुंडा दिला नाही. लग्नात मानपान केला नाही. आम्हाला प्लॉट घेण्यासाठी ३६ लाख रूपये आणून न दिल्यास तुला व्यवस्थित नांदविणार नाही. असे म्हणत जाचहाट करून मानसिक व शारीरिक त्रास देऊन शिवीगाळ करत घरातून हाकलून दिले, अशा आशयाची फिर्याद रुबीना अहमद यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून पती अनिस अहमद, सासू खुर्शीदबेगम अहमद, नणंद शबाना अहमद, दीर फेरोज अहमद (सर्व रा. मजरेवाडी, नई जिंदगी), दीर अमजद अहमद ( रा. हैद्राबाद) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पवार करत आहेत.