लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; गुन्हा दाखल, सोलापूरमधील घटना

By रूपेश हेळवे | Updated: April 13, 2023 14:32 IST2023-04-13T14:31:48+5:302023-04-13T14:32:16+5:30

पीडितेची ओळख सोलापुरातील आरोपी वाडी याच्याशी जानेवारी २०२३ मध्ये झाली.

Harassment of the married by luring them into marriage; Case registered, incident in Solapur | लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; गुन्हा दाखल, सोलापूरमधील घटना

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; गुन्हा दाखल, सोलापूरमधील घटना

सोलापूर : लग्नाचे आमिष दाखवून ३२ वर्षीय पीडितेला कर्नाटकातील बेंगलोर, म्हैसूर आदी ठिकाणी नेऊन अत्याचार करत नंतर लग्नास नकार दिल्याप्रकरणी कुमारगौरव शरणप्पा वाडी ( वय ४३, रा. हत्तुरे वस्ती) याच्यावर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत पीडितेने फिर्याद दिली आहे.

पीडितेची ओळख सोलापुरातील आरोपी वाडी याच्याशी जानेवारी २०२३ मध्ये झाली. ओळखीतून आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच तिला कर्नाटकातील बेंगलोर, म्हैसूर आदी ठिकाणी नेऊन पीडितेच्या इच्छे विरूध्द तिच्यावर अत्याचार केला.त्यानंतर मात्र आरोपीने पीडितेला लग्नास नकार दिला, अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी कुमारगौरव वाडी याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Harassment of the married by luring them into marriage; Case registered, incident in Solapur