शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्यावर शिक्षण सोडणार होतो पण शिक्षकांनी माझी बाजू मांडली : संतोष शेलार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 12:36 IST

गुरूपोर्णिमा विशेष; सोलापुरातील सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार याच्याशी संवाद

ठळक मुद्देशाळेपासूनच मी अभ्यासात चांगला होतो. नेहमी चांगल्या गुणाने उत्तीर्ण होत होतो - संतोष शेलार शालेय शिक्षण झाल्यावर मी सिव्हिल शाखेतून पदविकेच्या शिक्षणासाठी साताºयामधील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला - संतोष शेलार आर्थिक अडचणीमुळे मी शिक्षण सोडण्याचे निश्चित केले होते. मात्र, प्रा. के. एस. शेख, प्रा. व्ही. एस. चिरमुले आणि प्रा. एम. एस गोपाळ यांनी माझे मन तर वळविले - संतोष शेलार

शीतलकुमार कांबळे

सोलापूर:  घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मला शिकता येत नव्हते. शिक्षणासाठीचा खर्च भागविण्याची माझी ऐपत नव्हती म्हणून डिप्लोमाचे (तंत्रनिकेतन) शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, माझ्या शिक्षकांनी संस्थेमध्ये माझी बाजू मांडली. फक्त महाविद्यालयाचे शुल्क भरु शकत नाही म्हणून एका हुशार विद्यार्थ्याचे नुकसान व्हायला नको, असे म्हणत त्यांनी मला सवलत मिळवून दिली़ त्यामुळेच मी पुढे अभियांत्रिकीची पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करु शकलो, असा आपल्या शिक्षकांबद्दलचा अनुभव सोलापुरातील सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार यांनी सांगितला.

शेलार पुढे म्हणाले, शाळेपासूनच मी अभ्यासात चांगला होतो. नेहमी चांगल्या गुणाने उत्तीर्ण होत होतो. शालेय शिक्षण झाल्यावर मी सिव्हिल शाखेतून पदविकेच्या शिक्षणासाठी साताºयामधील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला.

आर्थिक अडचणीमुळे मी शिक्षण सोडण्याचे निश्चित केले होते. मात्र, प्रा. के. एस. शेख, प्रा. व्ही. एस. चिरमुले आणि प्रा. एम. एस गोपाळ यांनी माझे मन तर वळविलेच शिवाय महाविद्यालयात माझी बाजू मांडली. यामुळे मी शिकू शकलो, असेही ते यावेळी म्हणाले.

सिव्हिलमधील पदविका पूर्ण केल्यानंतर त्यांनी मला पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. यामुळेच मी सिव्हिलमधील पदवी व स्ट्रक्चरमधील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. या शिक्षकांनीच मला एमपीएससीची (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षा देण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यांच्या सल्ल्यामुळे मी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालो.

माझ्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला त्यांनी प्रोत्साहन दिले नसते तर मी जीवनात यशस्वी झालो नसतो. आताही मी माझ्या गुरुंच्या संपर्कात असतो. एखादी अडचण आली की त्यांच्याशी चर्चा करतो. ते आजही मला मार्गदर्शन करतात. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर खासगी कंपनीत काम करण्याऐवजी एमपीएसीच्या परीक्षेसाठी मी तयार झालो.

शिक्षकांनी आर्थिक मदतही केली महाविद्यालयाच्या परीक्षेत माझी शैैक्षणिक प्रगती चांगली होती. याबद्दल शिक्षकांनाही चांगलेच माहीत होते. महाविद्यालय सोडण्याचे ठरविल्यानंतर त्यांनी आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शविली होती. तशी वेळ आल्यानंतर त्यांनी मला मदत केली. यामुळे मला महाविद्यालय शिक्षण पूर्ण करता आले. इतकेच नव्हे तर त्यामुळे पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मी आयुष्यात काहीतर करुन दाखवू शकलो.

टॅग्स :Solapurसोलापूरpwdसार्वजनिक बांधकाम विभागGuru Purnimaगुरु पौर्णिमा