शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अशोक निंबर्गींच्या राजीनाम्याला पालकमंत्री जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 13:26 IST

सोलापुरातील सहकारमंत्री गटाचा आरोप;  उपोषणाचा इशारा; लोकमतच्या वृत्तानंतर सोलापूर शहर भाजपमध्ये खळबळ 

ठळक मुद्देकाँग्रेस नेत्यासोबत फोटो काढत फिरणाºया पदाधिकाºयाला शहराध्यक्ष करण्याचा डावमंत्र्यापासून वॉर्ड अध्यक्षापर्यंतच्या तक्रारी करण्यासाठी कार्यकर्त्याला प्रा. अशोक निंबर्गी यांचा खांदा शिल्लकप्रदेश कार्यकारिणीने प्रा. निंबर्गी यांचा राजीनामा स्वीकारू नये, अन्यथा कार्यकर्ते उपोषण आणि अर्धनग्न आंदोलन करण्याच्या तयारीत

सोलापूर : भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांच्या राजीनाम्यानंतर शहर भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या कुरघोड्यांना वैतागून प्रा.निंबर्गी यांनी राजीनामा दिल्याचा आरोप सहकारमंत्री गटातील पदाधिकाºयांनी केला आहे. प्रदेश कार्यकारिणीने त्यांचा राजीनामा स्वीकारु नये, अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा गुरुवारी सायंकाळी नगरसेवक आणि पदाधिकाºयांच्या बैठकीत देण्यात आला. 

मुदत संपल्याचे कारण देऊन भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी राजीनामा दिला आहे. २२ जून रोजी पक्षाच्या अधिवेशनात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. या वृत्ताने भाजपमधील एक गट अस्वस्थ झाला आहे. पालकमंत्री गटाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु, अस्वस्थ झालेल्या भाजपमधील पदाधिकाºयांनी गुरुवारी सायंकाळी शिवानुभव मंगल कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला आजी-माजी नगरसेवकांसह दीडशे पदाधिकारी उपस्थित होते. 

भाजपचे शहर सरचिटणीस हेमंत पिंगळे म्हणाले, प्रा. अशोक निंबर्गी यांच्या निर्णयामुळे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. 

काँग्रेस नेत्यासोबत फिरणाºयाला शहराध्यक्ष करणार का?- लोकसभा निवडणुकीच्या काळात काही लोक काँग्रेसच्या नेत्यासोबत फिरत होते. या काँग्रेस नेत्यासोबत फोटो काढत फिरणाºया पदाधिकाºयाला शहराध्यक्ष करण्याचा डाव रचला जातोय. ही गोष्ट भाजपचे कार्यकर्ते खपवून घेणार नाहीत. नेत्यांना एवढा माज आला असेल तर विधानसभेच्या निवडणुकीत कार्यकर्ता त्यांची जागा दाखवून देईल, असा इशाराही या बैठकीत अनेकांनी बोलून दाखविल्याचे पिंगळे यांनी सांगितले. 

कार्यकर्त्यांचा इशारा समजून घ्या : जन्नू - रामचंद्र जन्नू म्हणाले, मंत्र्यापासून वॉर्ड अध्यक्षापर्यंतच्या तक्रारी करण्यासाठी कार्यकर्त्याला प्रा. अशोक निंबर्गी यांचा खांदा शिल्लक आहे. पण कार्यकर्ता मोठा होतोय म्हणून नेतृत्वाला अडचण होत असावी, अशा भावना काही जणांनी या बैठकीत मांडल्या. प्रदेश कार्यकारिणीने प्रा. निंबर्गी यांचा राजीनामा स्वीकारू नये, अन्यथा कार्यकर्ते उपोषण आणि अर्धनग्न आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांचा इशारा समजनू घ्यावा. 

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपाVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखSubhash Deshmukhसुभाष देशमुख