कुसळंब मध्ये विविध ठिकाणी आंबेडकरांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:19 AM2021-04-19T04:19:51+5:302021-04-19T04:19:51+5:30

कुसळंब : विविध ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. कुसळंब येथे ग्रामपंचायत कार्यालय, इंदिरा सार्वजनिक वाचनालय ...

Greetings to Ambedkar at various places in Kusalamba | कुसळंब मध्ये विविध ठिकाणी आंबेडकरांना अभिवादन

कुसळंब मध्ये विविध ठिकाणी आंबेडकरांना अभिवादन

Next

कुसळंब : विविध ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.

कुसळंब येथे ग्रामपंचायत कार्यालय, इंदिरा सार्वजनिक वाचनालय व भीम नगर येथे भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.

ग्रामपंचायत कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच शिवाजी खोडवे यांच्या हस्ते झाले. यावेळी वैभव पोटरे, रोहित शिंदे, धनाजी काशीद, बाळासाहेब शिंदे , हरिचंद्र ढोबळे, पोलीस पाटील गणेश काळे, संतोष चौधरी, श्रीधर काशीद, बाळासाहेब जाधव, संतोष शिंदे उपस्थित होते.

इंदिरा सार्वजनिक वाचनालय मध्ये डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र मंगरुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच शिवाजी खोडवे, रामदास साठे, तडवी, गणेश चौधरी, संतोष चौधरी रोहित शिंदे, बालाजी पाटोळे, दत्ता झोंबाडे, प्रीतेश बोकेफोडे, प्रमिला शिंदे, रेखा बोकेफोडे, आशाबाई शिंदे उपस्थित होते. भीम नगर मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र मंगरुळे व शिवाजी खोडवे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भीम नगर मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संतोष चौधरी अमित शिंदे, रोहित शिंदे, गणेश पाटील, योगेश शिंदे, रोशन शिंदे, बाबासाहेब शिंदे, आबासाहेब शिंदे, धनाजी शिंदे, दादासाहेब शिंदे, विनोद शिंदे, मल्हारी शिंदे, महिला भगिनी उपस्थित होते.

---

फोटो : १८ कुसळंब

कुसळंब येथे विविध संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करताना राजेंद्र मंगरुळे, शिवाजी खोडवे, रामदास साठे, गणेश चौधरी, संजय बोकेफोडे

Web Title: Greetings to Ambedkar at various places in Kusalamba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.