राज्यपालांच्या विरोधात सोलापुरात घोषणाबाजी; शिवसैनिकांनी केला राज्यपालांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 12:07 IST2022-03-04T12:07:39+5:302022-03-04T12:07:47+5:30

सोलापूर विमानतळावर पोलीस बँड पथकाने राज्यपालांनी दिली मानवंदना.

Governor in Solapur; The governor reached the venue, beating the protesters | राज्यपालांच्या विरोधात सोलापुरात घोषणाबाजी; शिवसैनिकांनी केला राज्यपालांचा निषेध

राज्यपालांच्या विरोधात सोलापुरात घोषणाबाजी; शिवसैनिकांनी केला राज्यपालांचा निषेध

सोलापूर :- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आज सकाळी 10 वाजता हेलिकॉप्टरने सोलापूर विमानतळाच्या हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी सोलापूर महापालिकेच्या महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिकेचे आयुक्त पि. शिवशंकर, सोलापूर शहर पोलीस आयुक्त हरीश बैजल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम आदि उपस्थित होते.

प्रारंभी सोलापूर महापालिकेच्या प्रथम नागरिक महापौर यन्नम यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी शंभरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल महोदयांचे स्वागत केले. त्यानंतर पोलीस बँड पथकाने मानवंदना दिली.

शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल सोलापुरातील शिवसैनिकांनी राज्यपालांच्या सोलापुरातील कार्यक्रमाला विरोध दर्शविला होता. त्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. आसरा चौकात राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत राज्यपालांचा निषेध केला. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

Web Title: Governor in Solapur; The governor reached the venue, beating the protesters